cottan sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : तालुक्यातील पहिलेच कापूस खरेदी केंद्र; शहाद्यात सोमवारपासून कापूस मंडी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच बाजार समितीने सुरू केलेल्या अधिकृत कापूस मंडीचे सोमवारी (ता. २३) सकाळी नऊला पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दोंडाईचा रस्त्यावरील श्रीराम जिनिंगसमोर कापूस खरेदीचा प्रारंभ होणार आहे. (Cotton market in Shahada from Monday nandurbar agriculture news)

आमदार राजेश पाडवी यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील व संचालक मंडळाने केले आहे.

शहादा तालुक्यात सर्वाधिक एक लाख १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. एकरी सरासरी पाच क्विंटल कापूस उत्पादित झाला तरी साडेपाच लाख क्विंटलपर्यंत उत्पादन तालुक्यात निघते. खानदेश विभागात सर्वांत जास्त जिनर्स असलेल्या तालुक्यांपैकी शहादा एक तालुका आहे. तालुक्यात १२ जिनर्स आहेत. सुमारे एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय दर वर्षी कापसातून होतो. सुमारे १५ लाख क्विंटल कापसाची प्रक्रिया होईल एवढी क्षमता तालुक्यातील जिनर्सची आहे.

लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा फायदा

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोमवारपासून पहिलेच कापूस खरेदी केंद्र दोंडाईचा रस्त्यावरील श्रीराम जिनिंग समोर सुरू होत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस लिलाव पद्धतीने बाजार समितीच्या नियंत्रणाखाली होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला जास्तीत जास्त भाव मिळण्याची संधी शेतकऱ्यांना या उपक्रमामुळे मिळणार आहे. शिवाय लगतच्या तालुक्यातील तसेच गुजरातमधील शेतकऱ्यांनाही या खरेदी केंद्राचा फायदा होईल.

तालुक्याच्या अर्थकारणाला गती

तालुक्यातील बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी मध्य प्रदेश, राज्यातील खेतिया, पानसेमल, सेंधवा आदी ठिकाणी जात असतात. तसेच काही जिनर्स खेडा खरेदी करून शेतकऱ्याचा माल घेतात. लिलाव पद्धतीने कापूस विक्री केल्यास व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल व शेतकऱ्यांच्या आर्थिक फायदा होईल. याउलट जिनर्समध्ये थेट विक्री केल्यास खरेदीदार एकच असल्याने शेतकऱ्यांना हार्दिक लाभ कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते.

बाजार समितीच्या नियंत्रणाखाली शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची अधिकृत कापूस मंडी असल्याने बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसेल. बाजार समितीच्या या ऐतिहासिक निर्णयातून शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होईल, शिवाय तालुक्यातील अर्थकारणाला चालना मिळेल.

''कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली कापसाची खरेदी लिलाव पद्धतीने होणार आहे. शेतकरीहितासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने अधिकृत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतला. यातून शेतकऱ्यांना फायदाच होईल. शिवाय जिनर्सच्या माध्यमातून तालुक्यातील अर्थकारणाला चालना मिळेल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित माल या मंडित विक्रीसाठी आणावा.''-अभिजित पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT