Female devotees performing Aartya on the occasion of Durgashtami of Navratri Festival near Adimaya Dhandai Devi esakal
उत्तर महाराष्ट्र

Navratri 2023 : आदिमाया धनदाईदेवी जवळ गर्दीचा महापूर; लाखो भाविक नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2023 : धनदाईमातेच्या जयजयकाराने रविवारी पहाटेपासून आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवी मंदिर परिसर गजबजला होता. निमित्त होते नवरात्रोत्सवाची आठवी माळ अर्थात आश्विन दुर्गाष्टमी आणि रविवारची सुटी.

सुटीमुळे भाविकांचा महापूर लोटला. लाखो भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले. चक्रपूजा, आरत्या लावणे, नवसपूर्ती व दर्शनासाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातील भाविकांनी हजेरी लावली. (Crowd of Adimaya Dhandai Devi temple due to navratri dhule news)

दिवसभर मंदिराजवळ भाविकांची मांदियाळी होती. दिवसभरातून लाखो भाविकांनी दर्शन घेतले. येथील कुलस्वामिनी धनदाईदेवीस सुमारे ७७ पेक्षा अधिक कुळांचे भाविक कुलदैवत मानतात. घटस्थापनेपासून आदिमायेचे मंदिर भाविकांची श्रद्धा, भक्तिमय वातावरणात फुलून गेले आहे. आठवड्यापासून मंदिराजवळ धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

मंदिरात धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळासह बाहेरगावाच्या भाविकांनीही घटस्थापना केली. गेल्या आठ दिवसांपासून सुमारे सहा लाख भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. यंदा सर्वाधिक गर्दी झाल्याची माहिती धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष गजमल देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, खजिनदार उत्तमराव वंजी देवरे, सचिव महेंद्र दौलतराव देवरे व संचालक मंडळाने दिली.

सकाळपासून भाविकांनी शिस्तीने, रांगेत दर्शन घेत नवसपूर्तीचे कार्यक्रम केले. तरुण ऐक्य मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी, पोलिस कर्मचारी चोवीस तास गर्दीवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय स्वयंसेवकांनी दिवसभर सहकार्य केले. भाविकांच्या सेवेसाठी चोवीस तास पाणी व अन्य सुविधा तरुण ऐक्य मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

मंदिरालगत सावलीसाठी मंडप टाकण्यात आला आहे. दररोज पहाटे होणाऱ्या काकड आरती व सायंकाळच्या आरतीस भाविकांची गर्दी असते. मंदिरालगत भाविकांना चक्रपूजेसाठी मंडप टाकण्यात आला आहे.

पहिल्या दिवसापासून चैतन्य

नवरात्रोत्सवात आदिमाया धनदाईदेवीजवळ पहिल्या माळेपासून भाविकांची गर्दी वाढत आहे. पहिल्या माळेपासून देवीजवळ चैतन्य निर्माण झाले आहे. धनदाईदेवीजवळ मोफत निवासासह मुबलक पाणी, सावलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी (ता. २३) नवमी व मंगळवारी विजयादशमी (दसरा) दिवशीही मोठी गर्दी असणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करणारे भाविक देवीजवळ वाहन भेटविण्यासाठी आणतात. यंदा दुष्काळसदृष्यश परिस्थिती असतानाही श्रद्धेमुळे भाविकांची गर्दी वाढतीच आहे. दररोज देवीजवळ विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून, घटस्थापनेसह चक्रपूजा, नवसपूर्तीचे कार्यक्रम केले जात आहेत.

देवीजवळ आरत्या

देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. माघ अष्टमी, चैत्र अष्टमी व नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला देवीजवळ महिला भाविक अकरा, एकवीस, एकावन्न पुरणाचे वा कणकेचे दिवे लावतात. रविवारी पहाटेपासून महिला भाविकांची दिवे लावण्यासाठी लगबग सुरू होती. देवीला आहेर चढवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नवसपूर्ती केली.

कुलदैवत मानणारे भाविक नवरात्रोत्सव, चैत्र व माघ अष्टमीला सर्वाधिक महत्त्व देतात. देवीजवळ पाचवी, सातवी, अष्टमीच्या दिवशी भाविक चक्रपूजा, आहेर, साजशृंगार चढविणे, आरत्या लावण्यास प्राधान्य देतात. रविवारी सकाळी नाशिक व जळगाव जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT