indrayani-paddy-rice-500x500.jpg
indrayani-paddy-rice-500x500.jpg 
उत्तर महाराष्ट्र

इगतपुरीच्या हातसडीच्या तांदळाची मुंबईत चलती!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) खतांचा वापर व अत्याधुनिक मशिनरीमुळे धानाची तसेच, तांदळाची जीवनसत्त्वे कमी होत आहेत. आरोग्याची होणारी हानी लक्षात घेता घोटी येथील अन्नपूर्णा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने हातसडीचा तांदूळ, जात्यावरच्या डाळी बचतगटाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली अभियानांतर्गत मुंबई येथे महालक्ष्मी सारस प्रदर्शनात या मालाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विश्‍वासू बचतगटांनाच या ठिकाणी संधी

प्रदर्शनात राज्यातील निवडक बचतगटांचा सहभाग असतो. इगतपुरी तालुक्‍यातील या एकाच अन्नपूर्णा स्वयंसहाय्यता बचतगटाची निवड झाली असल्याची माहिती गटाच्या अध्यक्षा मथुरा जाधव यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैलींतर्गत प्रत्येक वर्षी भव्य प्रदर्शन होते. त्याअंतर्गत राज्यभरातील निवडक बचतगटांचीच निवड करण्यात येते. विशेष म्हणजे विश्‍वासू बचतगटांनाच या ठिकाणी संधी दिली जाते. घोटी येथील अन्नपूर्णा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचे सामाजिक कार्य व उत्पादनाची विश्‍वासार्हता लक्षात घेता या राज्यस्तरीय प्रदर्शनात या गटाची निवड करण्यात आली. 

अनेक बचतगटांची निर्मिती

मथुरा जाधव यांनी गेल्या 13 वर्षांत तालुक्‍यातील ग्रामीण भागात जाऊन बचतगटनिर्मितीसाठी विशेष मार्गदर्शन करत अनेक बचतगटांची निर्मिती केली आहे. 
त्यांनी बचतगटाचे फायदेदेखील सांगितले आहेत. दरम्यान, बचतगटाला जिल्हा समन्वयक संतोष डोंबे, सुशील चौधरी, संदीप सोनवणे यांचेदेखील सहकार्य लाभले आहे. 


मोठ्या प्रमाणात बचतगटाच्या माध्यमातून हातसडीचा तांदूळ विक्री

तेरा वर्षांत मी इगतपुरी तालुक्‍यात बचतगटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत आहे. आम्ही शुद्ध गुळाचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात करत असतो. विशेष म्हणजे हातसडीचा तांदूळ मोठ्या प्रमाणात बचतगटाच्या माध्यमातून विक्री करत असतो. -मथुरा जाधव, अध्यक्षा, अन्नपूर्णा महिला स्वयंसहाय्यता महिला बचतगट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT