demand of radish increase in surat shahada dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : क्रांतिकारकांच्या गावाचा मुळा खातोय भाव; सुरत, शहादा बाजारात लिलावास प्रथम प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : क्रांतिकारकांचे गाव म्हणून कापडणे जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत अग्रेसर आहे.

येथून दररोज वाशी, मालेगाव, शहादा, सुरत, सेंधवा आणि धुळे या बाजारांमध्ये एकंदरीत सरासरी २० ते ३० टन भाजीपाला पोचविला जात असतो. (demand of radish increase in surat shahada dhule news)

सध्या मुळ्याची काढणी सुरू आहे. सुरत व शहादा बाजारात मोठी मागणी वाढली आहे. प्रतिकिलो वीसपर्यंत भाव वाढले आहेत. सुरत बाजारात पहाटे येथील मुळा पोचल्यानंतरच लिलावास प्रारंभ होत आहे.

कापडणे परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी मुळ्याची मोठी लागवड केली आहे. सध्या काढणी सुरू आहे. सुरतच्या बाजारात प्रतिकिलो बारा ते वीसपर्यंत भाव मिळत आहे. हा भाव परवडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, सुरत आणि शहादा बाजारात कापडणेचा भाजीपाला दाखल झाल्यानंतर भाजीपाल्याच्या लिलावास प्रारंभ होत असतो. येथील सियाराम, महादेव, पाचपावली हे भाजीपाल्याचे ब्रॅन्ड तयार झाले आहेत.

"मुळा उत्पादनातून बऱ्यापैकी हाती पैसा खेळतो. दररोज मुळा काढणी सुरू असते. बाजारभावावर लक्ष ठेवावे लागते. प्रतिकिलो पंधरापेक्षा अधिकचा भाव परवडतो." -महेंद्र पाटील, युवा शेतकरी, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT