State General Secretary Irshad Jagirdar during a discussion with party leader and Deputy Chief Minister Ajit Pawar at NCP office.
State General Secretary Irshad Jagirdar during a discussion with party leader and Deputy Chief Minister Ajit Pawar at NCP office. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Ajit Pawar News : ‘अक्कलपाडा’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Ajit Pawar News : अक्कलपाडा धरण पूर्ण बांधले गेले असले, तरी भूसंपादनप्रक्रिया अपूर्ण असल्याने हा प्रकल्प निम्माच भरतो. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली तर जूनमध्ये प्रकल्पात शंभर टक्के पाणी अडविता येईल. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. अक्कलपाडा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला तर धुळे शहरालाही रोज पाणीपुरवठा होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या संकल्पनेतून धुळ्यात ५० बोअरवेल कामाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३) सकाळी डिजिटल उद्‍घाटन झाले. (Deputy Chief Minister Ajit Pawar statement Efforts to fill Akkalpada dam to full capacity dhule news)

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्री. पवार म्हणाले, की जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्याशी सर्किट हाउसला चर्चा करून आढावा घेतला.

अक्कलपाडा प्रकल्पाच्या अनुषंगानेही माहिती घेतली. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

पक्षातर्फे जंगी स्वागत

शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांचे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत झाले. फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण केले. मंत्री अनिल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, इर्शाद जहागीरदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, सारांश भावसार, सुमीत पवार, किरण शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, सत्यजित सिसोदे आदी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमानिमित्त श्री. पवार यांच्या स्वागतासाठी जमा केलेला ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

शशिकांत खैरनार, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चितोडकर, ज्ञानेश्वर माळी, उमेश महाले, ज्ञानेश्वर पाटील, संजय जगताप, जगन ताकटे, राजेश बागूल, गोरख देवरे, जावेद बिल्डर, गणेश जाधव, संजय अहिरे, प्रमोद साळुंखे, महिला जिल्हाध्यक्षा जया साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT