Collector Abhinav Goyal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सव : 26 फेब्रुवारीला उद्‍घाटन

Dhule : महोत्सवाचा जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने धुळे जिल्ह्यात २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव होणार आहे. महोत्सवाचा जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

महोत्सवाच्या पाचही दिवस सेलेब्रिटींच्या कार्यक्रमासह स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी असणार आहे. महासंस्कृती महोत्सवाबाबत जिल्हाधिकारी गोयल यांनी बुधवारी (ता. २१) दुपारी चारला जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला अधोरेखित करून विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील लढवय्याची माहिती जनसामान्यापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने धुळ्यात २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान धुळे शहरातील पोलिस कवायत मैदानावर पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव होईल. दररोज सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री दहादरम्यान कार्यक्रम होतील. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन होईल.

या पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवात विविध कलाप्रकार व कार्यक्रमांची मेजवानी असेल. महोत्सवासाठी कलाकार व कलाप्रकार यांच्या निवडीबाबत स्थानिक कलावंतांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यात उद्‍घाटन कार्यक्रमाला दिंडी काढली जाईल. यात ढोलताशा, लेझाम पथक, कलशधारी मुली, कानुबाई देखावा, आदिवासी संस्कृती दर्शन, टिपरी नृत्य, वारकरी दिंडीचा समावेश असेल.

तसेच आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्रकला सादरीकरण, शहनाई-तबला जुगलबंदी, शाहिरी शिवगर्जना, गीतगायन, वहीगायन, खानदेशी लोककला, अहिराणी लोकगीत, मराठी अहिराणी गीतगायन व नृत्य, भरतनाट्यम, एकपात्री नाटक, काव्यमय संगीत कार्यक्रम, गोंधळ, पोतराज, पोवाडा, वहीगायन, हिंगरी, जात्यावरची गाणी, मारुतीची जत्रा बालनाट्य, शाहिरी जलसा,

हिंदी-मराठी गाण्याची संगीतमय मैफल, आपली मायबोली, खानदेशी अहिराणी गीते, वारी-सोहळा संत परंपरा, पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदाय यावरील नृत्यनाटिका, मलखांब, जगणं तुमचं आमचं काव्यवाचन व गायन मैफल, महाराष्ट्र दर्शन, अभंग, महाराष्ट्राची संतपरंपरा, लावणी, अहिराणी नृत्य,

मोगरा फुलला भक्तिमय संगीत कार्यक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांचा कार्यक्रम, विश्व कठपुतली कार्यक्रम, बेलसर स्वारी नाट्य, कविसंमेलन, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित अरे संसार संसार संगीत व नाट्यमय कलाकृती, महाराष्ट्राची हास्यजत्रा, आयुष्यावर बोलू काही, वारी सोहळा संतांचा, मोगरा फुलला, शब्दसुरांची भावयात्रा तसेच मराठी हिंदी गझलांची भावगर्भ मैफल इत्यादी भरगच्च कार्यक्रम असतील, असे जिल्हाधिकारी गोयल म्हणाले.

बचतगट उत्पादनाचे स्टॉल

महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, वस्त्रसंस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन तसेच ४० बचतगट उत्पादनाचे स्टॉल्सही असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT