The pulse crop is being harvested by laborers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : भुईमूग शेंगा काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग; अपेक्षित भावाअभावी शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Dhule Agriculture : सध्या भुईमूग शेंगा काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. जोरदार सुसाट वादळी वारा वाहत असून, रब्बी हंगामातील पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. सध्या भुईमूग शेंगा काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीत ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तीनशे क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली आहे. (Agriculture Farmers rush to harvest groundnut pods )

त्यामुळे भावही घसरले आहेत. ओल्या-कोरड्या भुईमूग शेंगांना पाच हजार २०० ते पाच हजार ७०० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. कोरड्या शेंगांना सहा हजारांपासून ते सहा हजार ६०० रुपये भाव दिला जात आहे; परंतु खते, बी-बियाणे, मजुरी वाढल्याने भुईमूग शेंगांना मिळणारा भाव परवडत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.(latest marathi news)

ओली-कोरडीसाठी सात हजार रुपये, तर कोरड्या शेंगांना दहा हजार रुपये भाव दिला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या ३०० ते ४०० क्विंटल रोजची आवक झाली आहे. प्रामुख्याने तापी नदीकाठावरील शेतीतील व शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे.

शिंदखेडा तालुका दुष्काळी असल्याने अपेक्षित भाव शेतमालाला मिळत नाही. खर्चही निघणार नाही. चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे क्विंटलमागे दोन-तीनशे रुपये भाव कमी झाला आहे. खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी मेअखेर रब्बी पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT