Dhule Accident
Dhule Accident  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : अ‍ॅम्ब्युलन्स-ट्रक अपघात; चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : आर्वी (ता. धुळे) जवळ अ‍ॅम्ब्युलन्स ट्रकला धडकून झालेल्या अपघातात अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू झाला. या अपघातात अ‍ॅम्ब्युलन्समधील एका डॉक्टरसह दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालकाविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Dhule ambulance driver was killed in an accident involving ambulance truck)

सौंदाणे (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील अ‍ॅम्ब्युलन्स चालक बाळासाहेब धनजी पवार (वय ४८) दोन दिवसांपूर्वी अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच १५, जीव्ही ९८४)ने रुग्ण सोडण्यासाठी नाशिक येथून उत्तर प्रदेशला गेले. तेथून परतताना गुरुवारी (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास आर्वीजवळ अ‍ॅम्ब्युलन्सच्या पुढे ट्रक (एमएच १८, बीए ४४४९) चालत होता.

मात्र, या ट्रकने कोणतेही इंडिकेटर न देता अचानक रस्त्यावरील मार्गिका (ट्रॅक) बदलली. त्यामुळे मागून जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स ट्रकला धडकली.

या अपघातात अ‍ॅम्ब्युलन्सचालक बाळासाहेब पवार यांच्यासह डॉ. मंगलेश रावण निंबाळकर (४५, रा. मुंबई) व राजेश भोसले (५२, रा. नाशिक) गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी जखमींना तातडीने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी अ‍ॅम्ब्युलन्सचालक बाळासाहेब पवार यांना मृत घोषित केले. डॉ. मंगलेश निंबाळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच राजेश भोसले यांना नातेवाइकांनी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. या प्रकरणी मृत बाळासाहेब पवार यांचा मुलगा संकेत पवार याच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT