Tamasha artist (file photo)
Tamasha artist (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तमाशा कलेलाही दुष्काळाचे चटके; तमाशा फडमालकांवर उतरत्या भावाने घेण्याची वेळ

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : यंदाच्या दुष्काळाचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. कुठलेच क्षेत्र यातून सुटले नाही .ग्रामीण भागात यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र दुष्काळी स्थितीचा फटका लोकनाट्य तमाशा मंडळातील कलावंतांनाही बसला आहे. दुष्काळामुळे दर वर्षीच्या तुलनेत यंदा तमाशा फडमालकांना उतरत्या भावाने सुपारी (बिदागी) घेण्याची वेळ आली आहे. यंदा तीव्र दुष्काळाची झळ लोककलावंतांनाही बसली आहे. (Dhule News)

वाढती महागाई, आधुनिकतेच्या काळात करमणुकीची साधने बदलली. दूरचित्रवाणी, मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेटच्या काळातही तमाशासारख्या लोककलेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी लोककलावंत मेहनतीची पराकाष्ठा करतात. वाढते तापमान, दुष्काळाची झळ करमणुकीच्या व्यवसायाला बसली आहे.

येथील आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या यात्रेत करमणुकीसाठी भीमा-नामा अंचाळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. तमाशा मंडळाचे मालक नामाभाऊ अंचाळेकर यांची भेट घेतली असता दुष्काळी स्थितीमुळे तमाशा कलावंताची झालेली वाताहत त्यांनी कथन केली. ग्रामीण भागात आजही लोककलेला मानाचे स्थान असून, दुष्काळामुळे संकटे कमी होत नसल्याची व्यथा मांडली.

तमाशा फड उभारणीसाठी मालकाला आधीपासून लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यंदा खानदेशात दुष्काळामुळे यात्रांच्या वर्गणीत घट झाली आहे. परिणामी सुपाऱ्यांचे आकडेही उतरले आहेत. गोरगरीब जनता, शेतकरी हा तमाशाचा प्रेक्षक वर्ग आहे. (Latest Marathi News)

सर्वत्र दुष्काळाचे सावट गडद होत असल्याने तमाशालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेक तमाशा मंडळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने तमाशा कलावंतांसह शेतकरी, शेतमजुरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, अशी अपेक्षा नामाभाऊ अंचाळेकर यांनी व्यक्त केली.

प्रेक्षकांची साथ, दुष्काळामुळे अवकळा

अलीकडे महागाई, दुष्काळामुळे सर्व जण मेटाकुटीला आले आहेत. चाळीस ते पन्नास कलावंतांचा ताफा घेऊन ग्रामीण भागातील यात्रा-जत्रेत फिरणाऱ्या फडमालकाला, व्यवस्थापकाला कसरत करावी लागते. कारण फडातील कलावंतांचा पगार, मानधनापासून त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते.

प्रत्येक कलावंत कुटुंबातील सदस्य समजावा लागतो. म्हणून तमाशा कलावंतांना राजाश्रय द्यावा, अशी अपेक्षा कलावंत व्यक्त करतात. महाराष्ट्राची, मराठी माणसाची शान असलेली लोककला टिकून राहावी, अशी अपेक्षा अंचाळेकर यांनी व्यक्त केली.

कलावंतांचे जीवन कष्टप्रदच

तमाशातील नृत्यांगना ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कोणाची...’ अशी निर्भीड साद घालत ढोलकीच्या तालावर, घुंगरांच्या बोलावर नृत्य सादर करत समाजमनाचे मन हेलावून आपली व्यथा मांडतात. नृत्यांगना बेधुंद होऊन थिरकतात, दमतात, थकतात. मात्र चेहऱ्यावर तसा कुठलाही भाव न आणता प्रेक्षकांना माना डोलायला भाग पाडतात. ग्रामीण भागातील यात्रेत रात्री साडेनऊला सुरू झालेला लोकनाट्याचा कार्यक्रम रात्रभर सुरू असतो.

या काळात डोळ्यांवर झोपेचा अंमल चढू नये म्हणून दर तासाभरात ‘चहाचा’ घोट घेत तरतरी आणली जाते. तमाशात नाचून-नाचून थकलेल्या पावलांना कधी-कधी घुंगरू उतरविण्याचेही भान नसते. कधी-कधी रात्रीच कलावंत दुसऱ्या गावाकडे मार्गस्थ होतात. लोकनाट्यापुढे विविध अनेक आव्हाने उभी राहिली. तरीही कला जिवंत ठेवण्यासाठी आमचे अखंड प्रयत्न सुरू असल्याचे नामाभाऊ अंचाळेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

"दुष्काळामुळे ग्रामीण भागात शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गच आमचा खरा प्रेक्षक वर्ग आहे. आज शेती उत्पन्न नसल्याने प्रेक्षक माय-बाप नाराज आहेत. तरीही यात्रा-जत्रेत तमाशा रसिकांचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. हाच आनंद आम्हा कलावंतांना प्रेरणा देणारा आहे." - नामाभाऊ अंचाळेकर, मालक, भीमा-नामा तमाशा मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT