Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघावर 4 दशके साक्री तालुक्याचेच वर्चस्व! सत्तेत 6 भूमिपूत्रांचा सहभाग

धनंजय सोनवणे

साक्री : धुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर साक्री तालुक्याचे स्थान नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. यात लोकसभेचा धुळे मतदारसंघदेखील अपवाद नाही. आतापर्यंत लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान साक्री तालुक्यातील भूमिपुत्रांना मिळाला आहे. यंदाही भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झालेले खासदार डॉ. सुभाष रामराव भामरे हे साक्री तालुक्यातील मालपूरचे मूळ रहिवासी आहेत. (Dhule Lok Sabha Constituency)

भौगोलिकदृष्ट्या अतिशय विस्तीर्ण, पुरोगामी विचारसरणीचा तसेच आदिवासीबहुल, अशी साक्री तालुक्याची ओळख राहिली आहे. यातच राजकीयदृष्ट्या तालुका सजग राहिला असून यातूनच जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. लोकसभा असो वा जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रतिनिधित्व, अनेक वेळा तालुक्यातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

यातच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या ७२ वर्षांच्या कार्यकाळात दोघांच्या हॅटट्रीकसह ११ नेत्यांनी मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. यातील सहा जण हे साक्री तालुक्याचे भूमिपुत्र आहेत हे विशेष. याद्वारे साक्री तालुक्याला खासदारकीच्या रूपाने ३९ वर्षे संधी लाभली आहे.

सहा भूमिपुत्रांना बहुमान

देशात १९५२ या वर्षी स्थापन झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात पूर्वी साक्री तालुका तसेच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. २००९ ला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत साक्री विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघास जोडला गेला. धुळे लोकसभा मतदारसंघात आजवरच्या १७ लोकप्रतिनिधींपैकी सहा लोकप्रतिनिधी हे साक्री तालुक्यातील राहिले आहेत.

यात सर्वप्रथम काँग्रेसचे रेशमा भोये यांनी खासदारकीची हॅटट्रिक करत १९८० ते १९८९ पर्यंत सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले. १९९१ मध्ये काँग्रेसच्याच बापू चौरे यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १९९६ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पक्षाचे खासदार विजयी झाले, यातही साक्री तालुक्यातील साहेबराव बागुल यांच्या रूपाने भाजपने विजय मिळविला. (dhule political news)

नंतर १९९८ मध्ये पुन्हा एकदा साक्री तालुक्यातील काँग्रेसचे डी. एस. अहिरे हे विजयी झाले. १९९९ मध्ये भाजपने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला व साक्री तालुक्यातील रामदास रूपला गावित हे विजयी झाले. साक्री तालुक्यातीलच काँग्रेसच्या बापू चौरे यांनी २००४ मध्ये मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेत लोकसभेत प्रतिनिधित्व केले.

...तर हॅटट्रीकची संधी

धुळे लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये पूर्ण रचना झाली व साक्री तालुक्याचा समावेश नंदुरबार लोकसभा मतदारसंघात झाला. यानंतर २०१४ मध्ये देशभरात मोदी लाट तयार झाली. यात धुळे लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी पुन्हा एकदा साक्री तालुक्यातील भूमिपुत्र डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून चालून आली.

डॉ. भामरे यांनी केवळ खासदारकीच नव्हे; तर केंद्रात संरक्षण खात्याच्या राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. पुढे २०१९ च्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिल्याने ते निवडणुकीत विजयी झाले. आता मे २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारीची संधी दिली आहे.

या निवडणुकीत ते विजय मिळवू शकले तर रेशमा भोये यांच्यानंतर पुन्हा एकदा साक्री तालुक्यातील डॉ. सुभाष भामरे यांना धुळे लोकसभा मदारसंघांत खासदारकीची हॅटट्रिक साधण्याची संधी मिळू शकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT