crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाघाडी सरपंचावर उपसरपंचाकडून हल्ला; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Dhule Crime : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच किशोर माळी यांच्यावर शुक्रवारी सकाळी जमावाने तलवार, लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढविला.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच किशोर माळी यांच्यावर शुक्रवारी सकाळी जमावाने तलवार, लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढविला. जखमी माळी यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यातील प्रमुख संशयित तथा उपसरपंच जगदीश कोळी याच्यासह १२ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाघाडी गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Attack on Waghadi sarpanch by deputy sarpanch case filed against 12 people )

किशोर विठ्ठल माळी (वय ६०) वाघाडी ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. शुक्रवारी (ता. २०) सकाळी नऊला ते ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते. त्याच वेळी उपसरपंच जगदीश कोळी साथीदारांसह तेथे पोहोचला. तलवारीने वार करीत लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी त्यांनी माळी यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या किंकाळ्या ऐकून धावत आलेल्या ग्रामस्थांनी हल्लेखोरांच्या तावडीतून माळी यांची सुटका केली.

त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून धुळे येथे खासगी रुग्णालयात त्यांना रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. हल्लेखोरांनी माळी यांचा भाचा अनिल वेडू खलाणे व सुनील शालिकराव माळी यांनाही बेदम मारहाण केली. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनिल खलाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जगदीश कोळी, लोटन कोळी, दादू तथा रामप्रसाद कोळी, समाधान कोळी, किरण भरत कोळी, राज कोळी, अजय कोळी, किरण बाजीराव कोळी, राहुल कोळी, नीलेश कोळी, विशाल कोळी, जयेश कोळी, धीरज कोळी (सर्व रा. वाघाडी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पदाधिकाऱ्यांची गर्दी

या घटनेचे वृत्त कळताच उपजिल्हा रुग्णालयात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, डॉ. जितेंद्र ठाकूर आदींनी माळी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राजकीय वादातून हल्ला

वाघाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर गावात राजकीय वाद सुरू आहेत. त्याचेच पर्यवसान हल्ल्यात झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी वाघाडी गावात मोठा बंदोबस्त लावला असून, संशयितांचे अटकसत्र सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT