Police Inspector Dhananjay Patil of Devpur Police Station along with mobile thieves and team. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मोबाईल चोरटे अर्ध्या तासात जेरबंद; देवपूर पोलिस, एलसीबीची कारवाई

Dhule Crime : शहराच्या देवपूर भागात धूमस्टाइलने एकाचा मोबाईल लांबविणाऱ्या दोघा अट्टल चोरांना देवपूर पोलिस व एलसीबीच्या पथकाने अर्ध्या तासातच जेरबंद केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहराच्या देवपूर भागात धूमस्टाइलने एकाचा मोबाईल लांबविणाऱ्या दोघा अट्टल चोरांना देवपूर पोलिस व एलसीबीच्या पथकाने अर्ध्या तासातच जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. दोघे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मंगळवारी (ता.२६) रात्री सव्वा बाराच्या सुमारास देवपूर भागातील देवरे हॉस्पिटल समोरील कानुश्री रसवंतीसमोर अरुण अनिल चौधरी (वय २२, रा. महेदगाव, ता. सेंधवा, जि. बडवानी, ह. मु. गायत्री नगर धुळे) यास पत्ता विचारण्याचे बहाण्याने दुचाकीवर आलेल्या दोघांनी थांबविले. (Dhule Crime Mobile thieves jailed in half an hour)

त्यानंतर त्याच्या खिशातील दहा हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला. त्यादरम्यान त्याने परिसरात गस्तीवर असलेले देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या वाहनाला हात देत थांबविले व थोड्या वेळापूर्वीच दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी आपला मोबाईल हिसकावून नेल्याचे सांगितले.

पोलिस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ सूत्रे हलवत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील यांच्याकडून तांत्रिक माहिती घेतली. त्याचवेळी एलसीबीचे पथकही साक्री रोड परिसरात गस्तीस होते. त्यांनाही संशयितांचे वर्णन व तांत्रिक माहिती दिली.

त्यानुसार दोन्ही पथकांनी पांझरा नदी किनारी सापळा रचून अक्षय सुरेश चव्हाण (वय २५, रा. दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) व दीपक मारुती धनले (वय २५, रा. इंदिरानगर, गोंदुररोड, देवपूर, धुळे) यांना पकडले.

त्यानंतर पोलिस निरीक्षक पाटील हे फिर्यादी व त्याच्या नातेवाइकांसह तेथे पोचले. फिर्यादीने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ओळखले. दोघांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच-१८/सीसी-१०३१) मिळून आली.

तसेच त्यांच्याकडून आणखी एक मोबाईल सापडल्याने तोदेखील पोलिसांनी जप्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवर, अप्पर अधीक्षक किशोर काळे, सहायक अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक इंदवे, पंकज चव्हाण, बैसाणे, सौरभ कुटे, एलसीबीचे सहाय्यक उपनिरीक्षक पाटील, एस. एम. सुरसे, जगदीश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT