Crime News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यात 2 लाखांचा गांजा जप्त; वाहनासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गांजाची तस्करी रोखली. याप्रकरणी उस्मानाबादच्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड पासिंगच्या कारमध्ये दोन लाखांचा गांजा आढळला. गांजासह कार, असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील पथकासह गुरुवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एक पांढऱ्या रंगाची कार (एमएच १४ सीएक्स ९००७) शिरपूरकडून धुळ्याकडे गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते मुंबई-आग्रा महामार्गावरील माळीच पोलिस चौकी येथे थांबले. तेव्हा संशयित कार वेगाने धुळ्याच्या दिशेने जाताना दिसली.

पोलिस पथकाने वाहनाचा पाठलाग केला. माळीच चौकीच्या पुढे वाहनाला पकडण्यात आले. मग दोघांना ताब्यात घेतले. रमेश चांगदेव मुरूमकर व युवराज यशवंत पवार (रा. तीत्रंज, ता. भूम, जि. उस्मानाबाद), अशी त्यांची नावे आहेत. तपासणीत २४ किलो ६९० ग्रॅम गांजासदृश्य अमली पदार्थ मिळून आला. त्याची किंमत एक लाख ९७ हजार ५२० रुपये आहे.

गांजा व सुमारे पाच लाखांचे वाहन, असा सहा लाख ९७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, भूषण खेडवन, श्री. माळी, भरत चव्हाण, विनोद कोळी व रवींद्र महाले यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT