Police inspector Dheeraj Mahajan and team with two-wheeler seized from the thief. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 3 दुचाकींसह चोरटा जेरबंद; धुळे शहर पोलिसांच्या कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल

Crime News : धुळे शहरातील चंपाबाग, जमनागिरी भिलाटी येथे राहणारे सुरेश धनराज चव्हाण यांची दुचाकी (एमएच-१८/सीए-२६५२) २४ जूनला जिल्हा रुग्णालयाजवळील दर्गाजवळून चोरीस गेली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील कंबीरगंज परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत शहर पोलिसांच्या पथकाने दुचाकी चोरट्याला जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. (Dhule Crime Thieves jailed with 3 bikes)

धुळे शहरातील चंपाबाग, जमनागिरी भिलाटी येथे राहणारे सुरेश धनराज चव्हाण यांची दुचाकी (एमएच-१८/सीए-२६५२) २४ जूनला जिल्हा रुग्णालयाजवळील दर्गाजवळून चोरीस गेली. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कंबीरगंज परिसरात पाण्याच्या टाकीजवळील गोडावूनमध्ये छापा टाकला.

तेथे एक जण मिळून आला. त्याने त्याचे नाव पीर महम्मद मोहम्मद हनिफ (वय-२२, रा. कंबीजगंज, हाफीज सिद्दीकी नगर, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली व या गुन्ह्यात वापरलेली त्याची दुचाकी (एमएच-०५/बीडब्ल्यू-३६५७) व इतर दोन चोरीच्या दुचाकी काढून दिल्या. (latest marathi news)

एकूण ७० हजार ९९९ रुपये किमतीच्या या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, साहाय्यक पोलिस अधीक्षक ह्रषीकेश रेड्डी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष मोरे, बाळासाहेब डोईफोडे, कुंदन पटाईत, रवींद्र गिरासे, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, शाकिर शेख, वसंत कोकणी, तुषार पारधी, अमित रनमळे, महेश मोरे, अमोल पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Dussehra Melava 2025 Live Update: कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याला सुरुवात

परंपरा मोडायला घाबरत नाही... 'त्या' कारणामुळे दीपिका पदुकोण पुन्हा चर्चेत

Kantara 2 Twitter Review: कसा आहे रिषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १'? ट्विटर रिव्ह्यू वाचून लगेच कळेल; नेटकरी म्हणतात-

SCROLL FOR NEXT