Superintendent of Police Shrikant Dhiware, DYSP Bhagwat Sonwane, Police Inspector Shriram Pawar, Sub-Inspector Balasaheb Wagh, Krishna Patil and colleagues along with seized weapons and suspects. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 5 पिस्तुले, 11 काडतुसांसह जालन्याच्या दोघांना अटक; पोलिस अधीक्षकांकडून सांगवी पोलिसांचे कौतुक

Dhule Crime : मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करून परतणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोघांना सांगवी पोलिसांनी शिताफीने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करून परतणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोघांना सांगवी पोलिसांनी शिताफीने अटक केली. ११ मेस केलेल्या कारवाईत पाच गावठी पिस्तुले, ११ जिवंत काडतुसे आणि पल्सर दुचाकी असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रविवारी (ता. १२) सांगवी पोलिस ठाण्यात भेट देऊन या कारवाईबद्दल निरीक्षक श्रीराम पवार आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. ( Two arrested from Japan with 5 pistols and 11 cartridges )

डीवायएसपी भागवत सोनवणे उपस्थित होते. श्री. धिवरे यांनी गुन्ह्याची माहिती देताना सांगितले, की मध्य प्रदेशातील अवैध शस्त्रनिर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तुले घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. काही वेळाने दुचाकी (एमएच २०, एफई ५३६३)वर येणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.

मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेने पलायन केले. खामखेडा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी सोडून देत संशयित बाजरीच्या शेतात शिरले. पोलिसांनी शेतात शोध घेऊन दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता दीड लाख रुपये किमतीचे पाच गावठी कट्टे, २२ हजार रुपये किमतीची नऊ एमएमची ११ जिवंत काडतुसे आणि एक लाख ३० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयितांमध्ये बाबासाहेब रामभाऊ मिसाळ (वय २८, रा. जानेफळ, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) व परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ (२६, रा. देवळीगव्हाण, ता. जाफराबाद, जि. जालना) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT