orchard of Custard apple  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सीताफळबागेत केन काढणीची लगबग; म्हसदी परिसरात पसंतीचे पीक

Dhule News : अलीकडे फळशेतीला कमालीचे महत्त्व आले आहे. सध्या खरीप पिकांबरोबरच फळबागांची निगा, कीटकनाशके फवारणीसह सीताफळबागेत केन काढणी सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : अलीकडे फळशेतीला कमालीचे महत्त्व आले आहे. सध्या खरीप पिकांबरोबरच फळबागांची निगा, कीटकनाशके फवारणीसह सीताफळबागेत केन काढणी सुरू आहे. फळझाडांची अधिक उंची वाढू नये म्हणून सीताफळबागेमध्ये केन काढणी केली जाते. सध्या छाटणीनंतर सीताफळ बागेची काळजी घेतली जात आहे. पारंपरिकऐवजी आधुनिक तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीकडे शेतकरी वळले आहेत. (Custard apple cane harvesting in orchards)

फळशेतीत शेतकऱ्यांनी डाळिंब, सीताफळ, पपई, टरबूज, खरबूज, तर भाजीपाल्यात शेवगा पिके घेत आहेत. लालसर, तांबडी, भुरसट माती अशी भौगोलिक ओळख असलेल्या या भागात निसर्गाला पूरक असलेल्या अनेक फळांपैकी एक फळ म्हणजे सीताफळ. ककाणी, भडगाव, काळगाव, राजबाईशेवाळी, म्हसदी, बेहेड आदी भागाला लागून मोठे वनक्षेत्र आहे. पावसाळ्यात वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात गावरान सीताफळ उपलब्ध असतात.

केन काढणीवर भर

ककाणी (ता. साक्री) येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर भटू बेडसे यांनी सुमारे दहा एकर क्षेत्रात सीताफळाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात झाडांची छाटणी झाली असून, सध्या झाडांची उंची वाढू नये, झाडांवर वजन वाढू नये, डिशा खुडणी (केन) केली जात आहे. प्रत्येक झाडाची काळजी घेत, रासायनिकऐवजी सेंद्रिय खते देऊन बागेची निघा राखली जात आहे.

साधारणत: नोव्हेंबरमध्ये सीताफळ काढणीवर येईल. सध्या पावसाची रिपरिप आहे. सीताफळावर मात्र अशा नैसर्गिक संकटाचा फारसा परिणाम होत नसल्याची माहिती ज्ञानेश्वर बेडसे यांनी दिली. (latest marathi news)

परवडणारे पीक

इतर पिकांपेक्षा सीताफळ परवडणारे पीक असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. बाजारपेठेचा अभ्यास झाला आणि योग्य खरेदीदार मिळत गेल्याने दर बऱ्यापैकी मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. आता शासनाचा कृषी विभाग विकेल ते पिकेल या योजनेखाली प्रोत्साहन देत आहे. सीताफळासारख्या फळाला पल्प तयार करणाऱ्या कंपन्या हे मोठे मार्केट आहे. हैदराबाद, दिल्ली आणि नवी मुंबई-वाशी देशातील मार्केट आहेत. यातील सर्वांत मोठे मार्केट नवी मुंबई येथे आहे.

"सीताफळात उच्च प्रतीचे फायबर असते, व्हिटॅमिन, मिनरल हे घटक तर असतातच, त्याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविणारे असल्यामुळे सीताफळ खाल्ल्यास शरीरातल्या व्याधी म्यूकर रूपात बाहेर येत असल्यामुळे सर्दी झाल्यासारखे वाटू शकते. डोळे आणि हृदयाला आरोग्यदायी आहे." - ज्ञानेश्वर बेडसे, फळबागातदार शेतकरी, ककाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT