Tribal community
Tribal community esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : सातपुड्यातील आदिवासींवरही रोजगारासाठी भटकंतीचा वेळ

जगन्नाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा

कापडणे : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विहिरी व कूपनलिका आटल्या आहेत. बारमाही चालणारे स्रोतही तासभर चालत आहेत. रोजगारासाठी सातपुड्यातून आलेल्या आदिवासी मजुरांना रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या हाताला अधिक काम नसल्याने त्यांनी सातपुड्याची वाट धरली आहे. (Dhule Drought Time of wandering for employment even among tribals of Satpura)

या मजुरांमुळे धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शेतीची कामे वेगात आवरली जात असतात. दुष्काळामुळे त्यांच्यावरही रोजगारासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

हजारावर आदिवासी मजूर खानदेशात

खानदेशातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, रावेर, पारोळा व एरंडोल या तालुक्यांत सातपुड्यातून मोठ्या प्रमाणात मजूर शेतीकामासाठी दाखल होतात. त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवून घेतला आहे.

...अन्यथा खानदेशातील जमीन पडून

खानदेशातील तरुणाईचा पुणे, नाशिक, मुंबईकडे जाण्याकडे अधिक कल आहे. दर वर्षी हजारावर तरुण महानगरांमध्ये जाऊन रोजगाराचा प्रश्न सोडवून घेत असतात. परिणामी खानदेशातील शेतीसाठी मजुरांची मोठी उणीव भासत असते. ही उणीव आदिवासी मजुरांमुळे भरून निघत आहे, अन्यथा खानदेशातील हजारो एकर क्षेत्र मजुरांअभावी पडून राहिले असते.

स्थानिक मजुरांपेक्षा कमी मजुरी

सातपुड्यातून दाखल मजुरांचे मजुरीचे दरही कमी प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे शेतावरच वास्तव्य असल्याने राखणदारीचा प्रश्न सुटत असतो. गावातील मजूर रात्री शेतावर कामासाठी धजावत नाहीत. हे मजूर रात्रीची वीज असल्याने बागायतीचा भरणा करण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. या मजुरांना सुखसुविधा पुरविण्यासाठी शेतमालक प्रयत्नशील असतात. (latest marathi news)

ते कसताहेत शेती

स्थानिक शेतकऱ्यांची मुले नोकरीनिमित्त शहरांकडे धावताहेत. मोठ्या शेतकऱ्यांनी अधिकची शेती कसणे अवघड झाले आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती निमबटाई अथवा वार्षिक जुपने आदिवासी कसू लागले आहेत. विशेष म्हणजे विक्रमी भाजीपालाही पिकवू लागले आहेत. शेती कसणारे आदिवासी शेतीशिवारातच स्थायिक झाले आहेत.

जि.प. शाळांमध्येही आदिवासी मुले

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पटावरील निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी सातपुड्यातीलच आदिवासींची आहेत. दररोज शेतीशिवारातून ये-जा करू लागली आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे ही मुले अभ्यासापासून दुरावली आहेत. त्यांच्यापर्यंत ना शिक्षक पोचलेले ना ऑनलाइन शिक्षण पोचलेले आहे. सध्यातरी शिक्षणाची आबाळ होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.

गुणवत्तायादीतही चमकताहेत

सातपुड्यातील आदिवासींची मुले शाहू वस्तीतील मुलांच्या बरोबरीने गुणवत्ता जोपासू लागली आहेत. विशाल पावरा आणि मुकेश पावरा हे विद्यार्थी गेल्या वर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत चमकले अन् प्रवेश मिळविला.-----

"आदिवासी मजुरांमुळे शेती टिकून आहे. नाहीतर सोडून द्यावी लागली असती. स्थानिक मजुरीचे दर आणि कामाची वेळ परवडणारी नाही." -आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटनाा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT