Villagers sitting outside their homes due to explosion-like sounds. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धवळीविहीर परिसरात स्फोटसदृश आवाज! तो आवाज म्हणजे जलपुनर्भरणाचा परिणाम, सखोल अभ्यासाची शिफारस

Latest Dhule News : परिस्थितीचे गांभीर्य, ग्रामस्थांमधील भीती लक्षात घेऊन भूकंप शास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास करून अभ्यास मागवावा, अशी शिफारस जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे प्रशासनाला करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : धवळीविहीर (ता. शिरपूर) परिसरात ग्रामस्थांची झोप उडवणारे भूगर्भातील स्फोटसदृश आवाज म्हणजे भूजल पुनर्भरणाचे परिणाम असल्याची दाट शक्यता आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य, ग्रामस्थांमधील भीती लक्षात घेऊन भूकंप शास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास करून अभ्यास मागवावा, अशी शिफारस जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे प्रशासनाला करण्यात आली आहे. (Explosion like sound in Dhavlivihir area)

आदिवासी बहुल धवळीविहीर परिसरात २०२२ मध्ये जमिनीतून आवाज येण्यास सुरवात झाली. प्रारंभी आवाजांची तीव्रता कमी होती. त्यामुळे त्याकडे ग्रामस्थांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र २३ मध्येही आवाजांचे सातत्य कायम राहिले. २०२४ च्या पावसाळ्यात आवाजांची तीव्रता व व्याप्ती वाढली आहे. त्यासोबत जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांची तीव्रताही अधिक आहे.

या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांनी धवळीविहीर येथे भेट दिली. ग्रामस्थांकडून घडल्या प्रकाराची त्यांनी माहिती घेतली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक गिरीशकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल दिला. (latest marathi news)

सप्टेंबरच्या प्रारंभापासून आवाजांची तीव्रता वाढली आहे. या वर्षी परिसरातील आंबे, अमरिशनगर, बोरमळी, हरणबर्डी, भिलटपाडा आणि अंजनपाडा या गावपाड्यांपर्यंत आवाज जाणवत आहे. तसेच जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. या परिसरात भूकंप शास्त्रज्ञामार्फत सखोल अभ्यास करून अहवाल तयार करावा, अशी सूचना गोरे यांनी केली आहे.

गोरे यांच्या अहवालानुसार, २०२२ व या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भूजल पुनर्भरणाचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता आहे. पाणीपातळी वाढल्यामुळे भूगर्भातील पोकळींमध्ये कोंडली गेलेली हवा सांध्यांद्वारे तीव्र झटक्याने बाहेर येत असते. त्यामुळे विस्फोटसदृश आवाज निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT