arrest esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : अवैध सावकार बंब कोठडीत; इन्कम टॅक्ससह LICशी पत्रव्यवहार

अवैध सावकार बंब याने अनधिकृतपणे काही वित्तीय संस्थांच्या लॉकरमध्ये कोट्यवधींची रोकड, शेकडो सौदा पावत्या, गहाण खते, खरेदी खते आदी विविध कागदपत्रे दडवून ठेवली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अवैध सावकारांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केल्यानंतर एक दिवसाआड फिर्याद दाखल होण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. यात एलआयसी एजंट व अवैध सावकार संशयित राजेंद्र बंब याला जिल्हा न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर देवपूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री दाखल गुन्ह्यात बबन थोरात याची अटकेनंतर २३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली.

अवैध सावकार बंब याने अनधिकृतपणे काही वित्तीय संस्थांच्या लॉकरमध्ये कोट्यवधींची रोकड, शेकडो सौदा पावत्या, गहाण खते, खरेदी खते आदी विविध कागदपत्रे दडवून ठेवली. याबाबत पोलिस आणखी तपास करीत आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने इन्कम टॅक्स, एलआयसीशी पत्रव्यवहार केला आहे. इन्कम टॅक्स विभागाने पूर्वीच बंब याच्याशी संबंधी कागदपत्रे चौकशीसाठी मागितली होती. बंब याने कर्ज देताना ग्राहकाला एलआयसी पॉलिसीची सक्ती केली. घेतलेल्या रकमेच्या दीडपट पॉलिसी तो काढून दोन महिन्यांचे हप्ते कर्जाऊ रकमेतून काढून घ्यायचा. यात त्याने किती कमिशन कमविले व काही ग्राहकांनी पॉलिसी थांबविल्यावर किती सरेंडर फॉर्म भरले गेले. आणि त्यासंबंधी पैशाचे काय झाले याचाही तपास सुरू आहे. असे असताना आर्थिक गुन्हे शाखेकडून बंब याचा आझादनगर पोलिस ठाण्याने एका वेगळ्या गुन्ह्यात ताबा घेतला. त्यात त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बंब याचा भाऊ संजय बंब हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेतानाच पोलिसांनी संजय बंब याचा मुलगा सौरभ बंबची चौकशी सुरू केली आहे. राजेंद्र बंब याच्या चौकशीत सापडलेल्या डायरीत चारशेहून अधिक पैसे घेणाऱ्यांची नावे आढळली आहेत.

शोषणामुळे दोघांवर गुन्हा

व्याजासाठी व्यावसायिकाचे आर्थिक शोषण आणि त्याला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, तसेच त्याच्या खूनाचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संशयित दोघांवर देवपूर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. फर्निचरचे व्यावसायिक संजय किसन चौधरी (वय ४७, रा. भगवती नगर, बीसीसी हॉटेल मागे, देवपूर) यांनी रक्कमेची व्याजासह परतफेड करून त्यांच्याकडून नितीन उर्फ बबन मधुकर थोरात (वय ५५, रा. मनमाड जीन, धुळे) याने अधिक व्याजाची मागणी केली. त्यासाठी व्यावसायिकाला वेळोवेळी धमकी दिली. तसेच कुंडाणे फाटा व पारोळा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ व्यावसायिक चौधरी यांना अडवून बबन थोरात याच्यासह कारचालकाने बेदम मारहाण केली. त्यामुळे चौधरी यांच्या डोक्याला मोठी जखम होऊन ते बरेच दिवस रूग्णालयात दाखल होते. नंतरही थोरात याने कर्जाचे पैसे बाकी असून जोपर्यंत ते परत करत नाही तोपर्यंत दुकानाची ताबे गहाण नोटीसची प्रत परत देणार नाही, अशी वेळोवेळी धमकी देत चौधरी यांचे आर्थिक शोषण केले. या आशयाची फिर्याद त्यांनी दिल्याने संशयित थोरातसह व त्याच्या कारचालकावर गुन्हा दाखल झाला.

शहर पोलिसांची पथके मागावर

शहर पोलिस ठाण्यात रामबापू बागूल, नीलेश हरळ या अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून ते फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिस ठाण्याने पथक तयार केले असून, ते संशयितांच्या मागावर आहे. पोलिसांनी बळ दिल्याने अवैध सावकारांविरोधात पीडित नागरिकांनीच तक्रारीची मोहीम उघडल्याने रोज नवे कारनामे समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT