Zilla Parishad Chairperson Dharti Deore along with the beneficiary farmers during the distribution of orders for the commencement of irrigation wells.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लाभार्थ्यांना सिंचन विहीर कार्यारंभ आदेश; जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते वाटप

Dhule : पंचायत समितीत जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते सिंचन विहीर कार्यारंभ आदेशांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील पंचायत समितीत जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते सिंचन विहीर कार्यारंभ आदेशांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. सिंचन विहीर हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अध्यक्षा श्रीमती देवरे म्हणाल्या.

गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पंचायत समिती सदस्य तुषार महाले यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. (Dhule Irrigation well commissioning orders were distributed to beneficiaries by Zilla Parishad Chairperson Dharti Devere)

जून-२०२३ पासून आलेले प्रस्ताव विचाराधीन होते. सिंचन विहिरीसाठी एकूण दोन हजार ४०४ अर्ज प्राप्त होते. त्यातील एक हजार ८७२ अर्जदार पात्र ठरले. दरम्यान, आतापर्यंत धुळे तालुक्यांतर्गत एक हजार ६३८ प्रमाण आदेश पूर्ण झाले असून, २३४ प्रमाण आदेश पुढील दोन दिवसांत पूर्ण होतील, असे गटविकास अधिकारी चौधरी यांनी सांगितले.

प्रातिनिधिक स्वरूपात धुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी सुभाष पाटील, गणेश माळी, शिवाजी चौधरी, नजीर पटेल, आसाराम पाटील, आशाबाई पाटील, कारभारी पाटील, हारून पटेल, हिरामण पाटील, श्रीपत पाटील, शिवाजी पाटील, जिभाऊ पाटील, खंडू पाटील, अरुणाबाई पाटील, उषाबाई देवरे, बापू ठेलारी.

कल्याणी खैरनार, कोमलसिंग गिरासे, लक्ष्मण भिल, रामसिंग भिल आदी लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशवाटप करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT