Municipal Commissioner Amita Dagade-Patil and other officials releasing the provisional third list of beneficiaries of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana. esakal
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : आतापर्यंत 7 हजारावर लाभार्थींची यादी प्रसिद्ध; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Dhule News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करुन धुळे महापालिकेने शनिवारी (ता.२७) सुमारे ३५०० लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करुन धुळे महापालिकेने शनिवारी (ता.२७) सुमारे ३५०० लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली. धुळे महापालिकेने यापूर्वी दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने आत्तापर्यंत तीन याद्यांतून सुमारे ७२३२ लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. (list of 7 000 beneficiaries has been released)

जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा व मनपा प्रशासन कार्यवाही करत आहे. धुळे शहरात यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय मदतकेंद्रांची व्यवस्था केली आहे. या मदत केंद्रांवर महिलांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार दर शनिवार व बुधवारी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रक्रियेत शनिवारी (ता.२७) महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याहस्ते सुमारे ३५०० लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली.

याप्रसंगी उपायुक्त डॉ. संगिता नांदुरकर, नगरसचिव मनोज वाघ, महिला बालकल्याण विभागाच्या मिना सातभाई, हर्षाली चौधरी, प्रकल्प अधिकारी गणेश खोंडे, सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे आदी उपस्थित होते. मागील शनिवारी (ता.२०) सुमारे १२९८, बुधवारी (ता.२४) २४३४ व शनिवारी (ता.२७) सुमारे ३५०० अशा सुमारे सात हजार २३२ लाभार्थ्यांच्या याद्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या. (latest marathi news)

हरकतींची नोंद

दरम्यान, या अर्जांवर प्राप्त हरकतीचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहे. तसेच यापुढेही प्राप्त होणाऱ्या अर्जांबाबत दर बुधवारी व दर शनिवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर अर्जांची छाननी होऊन शासनाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्व अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांची प्रसिद्ध तात्पुरत्या याद्या प्रभागनिहाय मतदान केंद्रांवरही प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

धुळे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरदेखील त्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. यादीबाबत प्रत्येक मदत केंद्रावर हरकत नोंद करण्यात येणार आहे. केंद्रनिहाय प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT