Dhule Lok Sabha 2024 Esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha 2024: धुळ्यात पक्षांतर्गत मतभेद वाढल्याने भामरेंसमोर दुहेरी आव्हान; 'पाटील विरुद्ध पाटील' सामना रंगण्याची चिन्ह

Dhule Lok Sabha 2024: भाजपचे २००९ पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे सलग दोन वेळा निवडून आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha 2024: धुळे लोकसभा मतदारसंघात नेहमीच जातीय समीकरणे प्रभावी ठरत आली आहेत. या मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे २००९ पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. पक्ष नेतृत्वाने यावेळी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. पक्षांतर्गत मतभेद वाढल्याने भामरेंसमोर दुहेरी आव्हान असेल.

२०१९ चे चित्र

डॉ. सुभाष भामरे (भाजप) विजयी मते : ६,१३,५३३

कुणाल पाटील (काँग्रेस) मते : ३,८४,२९०

नबी अहमद (वंचित बहुजन आघाडी) मते : ३९,४४९

अनिल गोटे (अपक्ष) मते : ८,४१८

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,२९,२४३

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे यांची प्रचाराला सुरुवात

डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला मालेगाव, धुळ्यामधून विरोध

डॉ. भामरे यांची उमेदवारी बदलेल अशी अपेक्षा शिंदे गटासह भाजपमधील इच्छुकांना

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस लढविणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व श्‍याम सनेर यांची नावे चर्चेत

मतदारसंघात चार तालुक्यांचा समावेश

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मतदारसंघात रोजगाराचा प्रश्‍न गंभीर आहे. शेतीमाल व यंत्रमागावरील प्रक्रिया उद्योगाचा अभाव

धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात पाटचाऱ्या, कालव्यांचे प्रश्‍न कायम

कसमादेसाठी वरदान ठरणाऱ्या ‘मांजरपाडा - २’ प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT