dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Market Committee Election : निवडणुकीत 39 उमेदवार; कांटे की लढत

सकाळ वृत्तसेवा

Dhule Market Committee Election : जिल्ह्यात सर्वाधिक रोमहर्षक ठरणाऱ्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींतर्गत गुरुवारी (ता. २०) माघारीच्या अंतिम दिवशी ४१ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. (Dhule Market Committee Election 39 candidates in election dhule news)

त्यात व्यापारी व अडते मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजय चिंचोले आणि भाजप-भदाणे गटाच्या परिवर्तन पॅनलचे महादेव परदेशी बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे रिंगणात ३९ उमेदवार उरले असून, त्यांना शुक्रवारी चिन्हवाटप होईल.

येथील बाजार समितीवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे; परंतु यंदा काँग्रेससह महाविकास आघाडीला ताकदीने शह देण्यासाठी भाजप-बाळासाहेब भदाणे गट रिंगणात उतरला आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी प्रथम ३२० इच्छुकांनी अर्ज भरले.

नंतर त्यात ४० अर्ज वैध ठरले. त्यामुळे उर्वरित २८० इच्छुकांपैकी आजअखेर २५२ जणांनी माघार घेतली. यात रिंगणात उरलेले २८ आणि अपील मंजूर झालेले १३, असे एकूण ४१ उमेदवार रिंगणात राहिले. पैकी श्री. चिंचोले आणि श्री. परदेशी यांची बिनविरोध निवड झाल्याने १६ जागांसाठी महाआघाडी व भाजप-भदाणे गटातील मिळून एकूण ३९ उमेदवारांमध्ये कांटे की लढत होईल.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

चिंचोले, परदेशींचा सत्कार

आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल विरुद्ध खासदार डॉ. सुभाष भामरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलमध्ये रोमहर्षक लढत होणार आहे. व्यापारी मतदारसंघातून महादेव परदेशी बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी आमदार पाटील यांनी भेट घेत आभार व्यक्त केले, असे महाविकास आघाडीने सांगितले.

आमदार कुणाल पाटील यांनी बिनविरोध श्री. चिंचोले, श्री. परदेशी यांचा सत्कार केला. तसेच श्री. परदेशी, श्री. चिंचोले यांचा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयात सत्कार झाला. व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष नको, फूट पाडायची नाही म्हणून व्यापारी व अडते मतदारसंघासाठी व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात दोन्ही पॅनलने प्रत्येकी एक उमेदवार देण्याचा निर्णय झाला. तो वरिष्ठांना मान्य झाल्याने परिवर्तन पॅनलमधून माझी बिनविरोध निवड झाली, असे श्री. परदेशी यांनी सांगितले.

रिंगणात ३९ उमेदवार

शेतकरी विकास पॅनलतर्फे सहकार संस्था मतदारसंघातून बाजीराव पाटील (चिंचखेडे), गुलाबराव कोतेकर (शिरूड), विशाल सैंदाणे (मुकटी), यशवंत खैरनार (विंचूर), हृषीकेश ठाकरे (मोराणे प्र. ल.), नानासाहेब पाटील (बुरझड), गंगाधर माळी (रतनपुरा), नयना पाटील (मांडळ), छाया पाटील(लोणखेडी), कुणाल पाटील (बोरविहीर), विश्‍वास शिंदे (आर्वी), ग्रामपंचायत मतदारसंघातून योगेश पाटील (सायने),

संभाजी देवरे (सावळदे), रावसाहेब पाटील (काळखेडे), सुरेश भिल (शिरधाणे प्र. नेर), हमाल-मापडी मतदारसंघातून सतीश खताळ (धुळे) हे १६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. शिवाय रिंगणात बाळासाहेब रावण भदाणे (बोरकुंड), माधवराव पाटील (धमाणे), भावलाल पाटील (धाडरी), बापू माळी (आर्णी), सतीश देसले (देऊर खुर्द), नंदकिशोर पाटील (भोकर), साहेबराव माळी (नेर), विजय गजानन पाटील (शिरूड),

शालिनी पाटील (गरताड), ऊर्मिला भामरे (मेहेरगाव), शोभाबाई पाटील (कापडणे), अनिल पाटील (दापुरा), महेंद्र पाटील (चांदे), रोहिदास सूर्यवंशी (फागणे), छोटू मासुळे (गोताणे), अजय माळी (अकलाड), रेखा पाटील (भिरडाणे), राकेश पाटील (निमडाळे), रोहिदास तलवारे (आर्वी), रावसाहेब ऊर्फ जयसिंग गिरासे (बेहेड) व अन्य एक उमेदवार रिंगणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT