Har Ghar Tiranga Abhiyan Esakal
उत्तर महाराष्ट्र

Har Ghar Tiranga Campaign : हर घर तिरंगा अभियानात सहभाग नोंदवा; धुळे महापालिकेतर्फे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Har Ghar Tiranga Campaign : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’‘ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, आपल्या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी ‘आपली माती, आपला देश’ हा उपक्रम उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (Dhule Municipal Corporation appeal to participate in Har Ghar tiranga Abhiyan news)

यापूर्वी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात धुळेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. त्याच पद्धतीने या वर्षीही हा उपक्रम यशस्वी करायचा आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धुळे महापालिका हद्दीतील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये, खासगी तसेच सहकारी संस्था यांनी आपल्या कार्यालयासमोर तसेच शहरातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरासमोर किंवा घरावर राष्ट्रध्वज स्वयंस्फूतीने फडकावयाचा आहे.

ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी, ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. अर्धा तुटलेला, फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये, राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये, घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र १५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा, याबाबत ध्वजसंहितेचे पालन करावे, जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

माफक दरात ध्वज

यापूर्वी महापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात ध्वज वितरण केले होते. त्यातील सुस्थितीत असलेल्या ध्वजाचा वापर करून या उपक्रमात सहभागी व्हावे. दरम्यान, धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बचतगटामार्फत ध्वज विक्रीचा स्टॉल लावण्यात येत आहे, मुख्य टपाल कार्यालय येथेही माफक किमतीत ध्वज उपलब्ध असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT