Dhule municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात 80 कोटींचा कर थकीत! दंडमाफीसाठी 158 धनादेश जमा

Dhule News : महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील हद्दवाढीच्या गावांसह शहरातून पाणीपट्टी, घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेची १० एप्रिलअखेर सुमारे ८० कोटींची वसुली बाकी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील हद्दवाढीच्या गावांसह शहरातून पाणीपट्टी, घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेची १० एप्रिलअखेर सुमारे ८० कोटींची वसुली बाकी आहे. यात १२५ कोटी ६४ लाखांचा निधी जमा होणे अपेक्षित असताना केवळ ४५ कोटी ७४ लाखांची वसुली मनपाकडून झाली आहे. दंडमाफीअंतीची ही वसुली आहे. यात २०२४-२०२५ च्या मालमत्ता करावर ३० एप्रिलपर्यंत १० टक्के सूट राहणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कर भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले. (Dhule municipality 80 Crore Tax Due marathi news)

शहरात सुमारे ९० हजारांवर मालमत्ताधारक आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ताधारकांनी महापालिकेत कराचा भरणा केलेला नाही, तर अनेकांनी मालमत्तेची नोंद केलेली नसल्याचे उजेडात आले आहे. महापालिकेच्या मालमत्ता करवसुली विभागाने दहा हजारांपुढील थकबाकीदारांची माहिती संकलित केली आहे.

त्यानुसार काहींनी तर लाखाचा टप्पा ओलांडल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी सूट देण्यात आली आहे. तरीही त्याचा बहुसंख्य मालमत्ताधारकांनी लाभ न घेतल्याने सुमारे ८० कोटी रुपयांचा पाणीपट्टी, घरपट्टीचा कर अद्याप थकीत आहे.

स्वतंत्र कक्ष कार्यान्वित

महापालिकेत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. त्यात नियमित आणि थकबाकीची रक्कम जमा होते. अनेक जणांकडून ऑनलाइनचा वापर होत आहे. पैसे भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ३१ मार्च ही मुदत संपुष्टात आल्यावर काहींनी धनादेश देण्यास सुरवात केली.

त्यासाठी १० एप्रिल अंतिम मुदत होती. त्यानुसार ३१ मार्चनंतर १० एप्रिलपर्यंत शास्ती अर्थात दंडमाफीसाठी १५८ धनादेश जमा झाले आहेत. सोमवारी (ता. १५) अथवा १६ एप्रिलला त्याचा ताळमेळ जुळविला जाईल, असे वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे यांनी सांगितले.  (latest marathi news)

पोलिसांची मदत घेणार

थकबाकी वसुलीकामी महापालिका प्रशासनाकडून खास पथकाची नियुक्ती झाली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. विशेष म्हणजे दहा हजारांवर रक्कम असल्यास लिपिकवर्गीय कर्मचारी कारवाई करत आहेत. यात २५ हजारांवर थकीत रकमेवर त्या भागांचे निरीक्षक कारवाई करत आहेत. शिवाय, थकबाकीदारांकडून वसुली सुरू असताना काही अडचणी आल्यास पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर वसुलीत १० टक्के सूट

शहर आणि हद्दवाढ मिळून १२५ कोटी ६४ लाखांची मागणी होती. त्यांपैकी ४५ कोटी ७४ लाख वसूल झाले. शहराची मागणी ५८ कोटी ९० लाखांची मागणी होती. त्यांपैकी ३० कोटी ९० लाखांची वसुली झाली आहे. हद्दवाढीच्या गावांची मागणी ६६ कोटी ७४ लाख होती.

पैकी १४ कोटी ८४ लाखांची वसुली झाली आहे. २०२४-२०२५ च्या मालमत्ताकरावर एप्रिलमध्ये १० टक्के सूट देण्यात येते. त्यानुसार मालमत्ताधारकांनी संपूर्ण कराचा भरणा करून लाभ घ्यावा. ही सूट ३० एप्रिलपर्यंत राहणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT