Members raising their hands against the CEOs during the Zilla Parishad meeting and passing the no-confidence motion on Wednesday.
Members raising their hands against the CEOs during the Zilla Parishad meeting and passing the no-confidence motion on Wednesday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘सीईओं’विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर; जिल्हा परिषद सभेत सर्वपक्षीय सदस्यांची एकजूट

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पसंत न पडणारी कार्यशैली आणि विश्‍वासात न घेता मनमानी कारभाराचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरोधात सर्वपक्षीय सदस्यांनी बुधवारी (ता. १३) अविश्‍वास ठराव मंजूर केला. त्यांना शासनाने परत बोलवावे, अशी मागणी एकजूट झालेल्या सदस्यांनी सभेत केली. (Dhule No confidence motion passed against CEO)

सदस्य संजय पाटील यांनी सीईओ गुप्ता यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मांडला. यात चार गैरहजर सदस्य वगळता उर्वरित एकूण ५१ सदस्यांनी हात उंचावून अविश्‍वास ठराव मंजूर केला. सत्ताधारी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष सदस्यांनी एकजूट होत हा खळबळजनक निर्णय घेतला.

नेमके कारण काय?

सदस्यांच्या आरोपांनुसार सीईओ गुप्ता यांनी रविवारी शिक्षण विभागाशी संबंधित २३ केंद्रप्रमुख, आठ विस्ताराधिकाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबविली. यात अध्यक्ष, शिक्षण सभापतींना विश्‍वासात न घेता परस्पर ही प्रक्रिया राबविली. यानंतर प्रक्रियेत अनियमित कारभार झाल्याच्या तक्रारी या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. सचिन फकीरचंद ठोके यांना आंतरजिल्हा बदली हवी होती.

त्यासाठी त्यांनी तत्कालीन शिक्षण सभापती महावीरसिंह रावल यांच्याकडे विनंती मागणी केली. त्यानुसार श्री. रावल यांनी सीईओ गुप्ता यांना ठोके यांच्या बदलीविषयी विनंती केली. ती सीईओंनी काही कारणास्तव अमान्य केली. यानंतर ठोके थेट श्री. रावल यांच्याकडे बदली झाल्याने पेढे घेऊन गेले.

बदली प्रक्रिया नियमात नाही, असे सांगणाऱ्या सीईओंनी ठोके यांची बदली कशी केली, असा प्रश्‍न उपस्थित करत श्री. रावल यांनी आमची कामे होत नसतील तर सभापती पदावर का राहावे, अशी भूमिका मांडली. अनियमित कारभार आणि विविध कारणांमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत सदस्यांनी सीईओंविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर केला. (latest marathi news)

सीईओ गुप्ता यांना अधिकारपदावरून शासनाने परत बोलवावे, असा ठराव सदस्यांनी मंजूर केला. जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे यांनी प्रशासनाकडून सदस्या सुनीता शानाभाऊ सोनवणे यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात सभागृहात खंत व्यक्त केली.

खोटे आरोप; पुरावा दिल्यास नोकरी सोडेन...

सभेनंतर अविश्‍वास ठरावाबाबत बोलताना सीईओ गुप्ता म्हणाले, की जिल्हा परिषद सभेतील अविश्‍वास ठरावाबाबत जे विषय मांडले गेले ते अमान्य आहेत. नियमाप्रमाणे काम करण्यास प्राधान्य दिले आहे. अध्यक्ष, सभापतींना विश्‍वासात घेऊनच कामकाजाचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मनमानी कारभाराचा प्रश्‍न येऊ शकत नाही. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न कायम ठेवलेले आहेत.

सदस्यांना माझ्याविरोधात अविश्‍वास ठराव का मांडवासा वाटला ते खऱ्या अर्थाने समजून आलेले नाही. केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अध्यक्षांना विश्‍वासात घेऊनच राबविली आहे. आंतरजिल्हा बदलीतील शिक्षक ठोके यांच्याबाबत प्रथम ग्रामीण विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे निर्णय सांगितला गेला.

नंतर शिक्षण विभागाने सादर केलेल्या नियमानुसार शिक्षक ठोके यांची बदली होत असल्याने तसा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत झाल्या नाहीत अशा अधिक प्रमाणात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीसंदर्भात मी पारदर्शक प्रक्रिया राबविली. त्या वेळी कुठल्याही स्वरूपाची तक्रार झाली नाही.

मग आताच कशी तक्रार होते आहे ते समजून आलेले नाही. वास्तविक, सभेत अविश्‍वासाचा ठराव मांडण्यापूर्वी सदस्यांनी एकत्रित चर्चा केली असती तर किमान मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा मान राखता येणे शक्य होते. ते बरे झाले असते. सदस्यांकडून होणारे आरोप हे निखालस खोटे, निराधार आहेत.

आरोपांसंदर्भात कुठलाही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. एखादा पुरावा सादर केल्यास मी ‘आयएएस’ सेवेचा राजीनामा देईन. मी एका चांगल्या आणि संघर्षरत कुटुंबातील सदस्य असून, हातून काही चुकीचे घडणार नाही याबाबत दक्ष असतो, असेही सीईओ गुप्ता यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT