Officials of Gram Panchayat while inspecting nutrition in Kendrashala. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : टंचाईग्रस्त गावांतील शाळांमध्ये सुटीतही शिजणार पोषण आहार

Dhule News : धुळ्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. शासनाने मंडळनिहाय दुष्काळ व टंचाईग्रस्त गावेही घोषित केली आहेत.

जगन्नाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा

कापडणे : धुळ्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. शासनाने मंडळनिहाय दुष्काळ व टंचाईग्रस्त गावेही घोषित केली आहेत. दुष्काळग्रस्त गावांमधील शाळांमध्ये सुटीतही पोषण आहार सुरू ठेवला जातो. यासाठी केंद्राने २०१६ मध्येच राज्यांना सुचविले आहे. (Nutritious food will be cooked even during holidays in schools in drought village)

यानुसार या वर्षीही उन्हाळी सुटीतही पोषण आहार सुरू राहील का, याविषयी चर्चा सुरू आहे. गुरुजींचेही त्याकडे लक्ष लागून आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यात दुष्काळाची अधिक भीषण परिस्थिती आहे. १०७ गावांमध्ये अधिक टंचाईची स्थिती आहे. रोजगाराची परिस्थितीही गंभीर आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाईहीची स्थितीही गंभीर आहे. शासन दुष्काळग्रस्त गावांमध्ये विविध योजना राबवीत असते.

सध्या तरी कोणत्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत हे समजणे अनाकलनीयच झाले आहे. दुष्काळग्रस्त गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये उन्हाळी सुटीतही पोषण आहार योजना राबविली जाते. २०१७, २०१८ व २०१९ ही तीन वर्षे सलग पोषण आहार योजना सुटीतही राबविली गेली होती.

या वर्षीही दुष्काळी स्थिती आहे. ही योजना शासन राबविली जाते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. मे महिन्यासाठी आवश्यक धान्यादी साठा पुरविणे आवश्यक आहे, अद्याप पुरविला गेलेला नाही. ही योजना गुंडाळली गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. (latest marathi news)

सारेच निवडणुकीत व्यस्त

अधिकारी, कर्मचारी, प्रशासन आदी सारेच निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मे महिना पूर्णतः निवडणुकीतच जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पोषण आहार योजना राबविली जाईल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

२०१९ मध्ये...!

राज्यात २०१९ मध्ये २६ जिल्ह्यांतील १५१ तालुके व २६१ महसुली मंडळांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती होती. सुमारे ४० हजार २८८ प्राथमिक शाळांमध्ये उन्हाळी सुटीतही पोषण आहार शिजला होता. यासाठी प्रत्येक शाळेवर एप्रिलमध्येच धान्यादी मालाचा पुरवठा झाला होता. २०१७, २०१८ व २०१९ हे तीन वर्षे दुष्काळ होता. सलग तिसऱ्या वर्षी सुटीत पोषण आहार शिजला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

Railway Employees Protest: रेल्वे आंदोलन परवानगीशिवाय! अहवाल मागवला; कारवाई होणार

Video : थाटात पार पडला जयवंत वाडकरांच्या लेकीचा साखरपुडा ! मल्याळी जावई आणि स्वामी समर्थांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT