Prime Minister Narendra Modi inaugurated various schemes of Indian Railways including 'One Station-One Product' through television system on Tuesday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘एक स्थानक-एक उत्पादना’द्वारे रोजगाराला चालना

Dhule News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांपासून देशभरात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे कार्य सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांपासून देशभरात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८५ हजार कोटी रुपयांच्या भारतीय रेल्वेच्या सहा हजारांहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण व शिलान्यास होत आहे. यात एक स्थानक-एक उत्पादन व जनौषधी केंद्रांचाही समावेश आहे. यातून रेल्वेस्थानकांद्वारे रोजगार उपलब्धीलाही चालना मिळेल, असा सूर मान्यवरांनी लावला. (Dhule of employment through One Station One Product)

भारतीय रेल्वेच्या ८५ हजार कोटी रुपयांच्या निधीतून देशभरातील विविध योजनांचे लोकार्पण व शिलान्यास झाला. त्या अनुषंगाने येथील रेल्वेस्थानकातही रेल्वे विभागातर्फे कार्यक्रम झाला. त्यात श्री. अंपळकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, रेल्वेचे अधिकारी अर्पित गुढदे, माजी महापौर प्रतिभा चौधरी.

माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा वैशाली शिरसाट यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

रेल्वेस्थानकांद्वारे रोजगार

श्री. अंपळकर म्हणाले, की स्थानिक पातळीवरील उत्पादनांना मागणी वाढावी, त्यांची विक्री होऊन उत्पादकांना अधिकाधिक रोजगार मिळावा व देशी उत्पादन विक्रीतून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून एक स्थानक-एक उत्पादन याअंतर्गत रेल्वेस्थानकांमध्ये एक हजार ५०० स्टॉल उभारण्यात आले आहेत. (latest marathi news)

यातून विविध वस्तू उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागणार आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांतून येथील रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी महापौर सोनार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात काम होत आहे. खासदार डॉ. भामरे यांनी जिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम दिला आहे.

माजी महापौर कर्पे यांनी ‘एक स्थानक-एक उत्पादन’ या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांत भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे श्री. गवळी म्हणाले.

रेल्वेचे अधिकारी गुढदे, दयाशंकर द्विवेदी, प्रशांतकुमार, राजीवकुमार, एच. डी. ठाकूर, व्ही. एम. नगराळे, स्टेशन प्रबंधक संतोष जाधव, संतोष पाटील, चंद्रकांत कवडे, रामेश्वर नंबोळकर, विशाल पाटील, भूपेंद्र पाटील, दुर्गेश ठाकूर आदींनी संयोजन केले. भाजपचे जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT