Pratibha Shinde while giving information in a press conference about Fair Rights Conference under Bharat Jodo Nyayatra. Neighbors Sonalben Patel, Ashwini Patil etc.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatra : खासदार राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार : प्रतिभा शिंदे

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १३ मार्चला धुळ्यात येणाऱ्या भारत जोडो न्याययात्रेदरम्यान धुळ्यात महिला न्याय्य हक्क परिषद होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १३ मार्चला धुळ्यात येणाऱ्या भारत जोडो न्याययात्रेदरम्यान धुळ्यात महिला न्याय्य हक्क परिषद होणार आहे. यात खासदार गांधी महिलांशी संवाद साधतील. सकाळी आडेअकराला शहरातील मालेगाव रोडवरील गुरुद्वाराशेजारील वालचंदबापू हॉटेलजवळ ही परिषद होईल. यात खानदेशातील १५ महिला सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (dhule Pratibha Shinde statement of MP Rahul Gandhi to interact with women marathi news )

भारत जोडो न्याययात्रेच्या अनुषंगाने सोमवारी (ता. ११) नॉर्थ पॉइंट शाळेत पत्रकार परिषद झाली. श्रीमती शिंदे, एआयसीसी सहप्रभारी सोनलबेन पटेल, अश्विनी पाटील, प्रवक्ता हनुमंत पवार आदी उपस्थित होते. श्रीमती शिंदे म्हणाल्या, की मागील दहा वर्षांत देशभरात महिला व मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची महागाई केंद्र सरकारच्या आशीर्वादाने प्रचंड वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो आहे. वाढती बेरोजगारी, महिला व मुलींच्या रोजगाराचा प्रश्न अधोरेखित करत आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील मुलींचे प्रश्न वाढले आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर वर्गातील महिलांना केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा सर्वाधिक त्रास होत आहे. (latest marathi news)

याला वाचा फोडण्यासाठी भारत जोडो न्याययात्रेच्या माध्यमातून शहरात १३ मार्चला महिला न्याय्य हक्क परिषद होईल. या परिषदेत खासदार गांधी महिलांशी संवाद साधतील. जाहीरनाम्यात महिलांसाठी विविध योजना जाहीर करतील.

या परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, खासदार दिग्विजयसिंह, जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, आमदार कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. शहर व परिसरातील महिलांनी परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT