Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in Municipal General Assembly. Neighbor Manoj Vagh. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : देवपूर मार्केट जागेचे नव्याने संपादन, आरक्षण कायम; महासभेत ठराव मंजूर

Dhule Municipality News : भूसंपादन कायदा २०१३ नुसार नव्याने भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचा ठराव गुरुवारी (ता. २२) महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : शहराच्या देवपूर भागातील मार्केटसाठी आरक्षित (सर्व्हे क्रमांक ३५/१/ब सिटी सर्व्हे क्रमांक ८४९४ क्षेत्र ४०६० चौरसमीटर) जागेवर पूर्वीचे आरक्षण कायम ठेवून सुधारित भूसंपादन कायदा २०१३ नुसार नव्याने भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचा ठराव गुरुवारी (ता. २२) महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला.

त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात महापालिकेला अवाढव्य आर्थिक भुर्दंड बसणार नाही, शिवाय संबंधित जागेचे आरक्षणदेखील कायम राहील, अशी अपेक्षा आहे. (new land acquisition proposal was approved in general meeting of municipal corporation)

तसेच शहराच्या चितोड रोड भागातील तुळसाबाईचा मळा सर्व्हे क्रमांक ५२९/१/अ च्या आरक्षणात फेरबदल करण्यास महासभेने अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे शासनाच्या मंजूरीनंतर या भागातील रहिवाशांना सातबारा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिका प्रशासकांना प्राप्त अधिकारानुसार गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण महासभा सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.

महासभेच्या अजेंड्यावर काही महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषय होते. यात प्रामुख्याने गेल्या काही वर्षांपासून अत्यंत क्लिष्ट स्वरूप प्राप्त झालेल्या शहराच्या देवपूर भागातील मार्केटसाठी आरक्षित (सर्व्हे क्रमांक ३५/१/ब सिटी सर्व्हे क्रमांक ८४९४ क्षेत्र ४०६० चौरसमीटर) जागेचे आरक्षण कायम ठेवून नव्याने भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचा विषय होता. हा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.

चाळीस कोटींपर्यंत मागणी

संबंधित जागेवर जेल रोडवरील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन प्रस्तावित होते. नंतरच्या काळात लक्ष्मीबाई देव हॉस्टेलच्या जागेवर अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला. २०१३ चा निवाडा दोन कोटी ५५ लाख ७० हजार १०० रुपये होता.

दरम्यान, जागामालकाने न्यायालयात दावा दाखल करत २० कोटी नुकसानभरपाईची मागणी केली. नंतरच्या काळात जागेचे नवीन मालक किशोर बाफना यांनी ४० कोटी द्यावेत अन्यथा या प्रकरणी संबंधित मिळकत अधिग्रहण करण्याचा विचार सोडून द्यावा, अशी विनंती केली.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुधारित भूसंपादन कायदा २०१३ नुसार नव्याने जागेचा भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे नव्या प्रस्तावातून महापालिकेला अधिक आर्थिक झळ सोसावी लागणार नाही शिवाय जागेचे आरक्षणही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.

तुळसाबाईचा मळ्याबाबत ठराव

शहरातील चितोड रोड भागातील तुळसाबाईचा मळा सर्व्हे नंबर ५२९/१/अ च्या आरक्षणात फेरबदल करण्याचा विषय होता. मंजूर विकास योजना आराखड्यात ही जागा ‘हाउसिंग फॉर अर्बन पुअर’ असे आरक्षण आहे. हे आरक्षण बदलल्यास तेथील नागरिकांना सातबारा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. या अनुषंगाने मायनर मॉडिफिकेशनचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

याबाबत नोटीस प्रसिद्ध करून त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. मुदतीत यावर हरकती प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे हा विषय अंतिम मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवण्यात आला. महासभेने त्याला मंजुरी दिली. हा ठराव आता शासनाकडून मंजूर झाल्यानंतर तुळसाबाईचा मळा भागातील नागरिकांना सातबारा उतारा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे.

दसेरा मैदान व्यापारी संकुल

शहर मंजूर विकास योजनेतील आरक्षित भूखंड फायनल प्लॉट नंबर १५३ या आरक्षित जागेवर (दसेरा मैदान) व्यापारी संकुल विकसित करण्याचा विषयही महासभेत मंजूर झाला. या कामासाठी तीनदा निविदा मागवूनही कुणीही सहभाग न घेतल्याने आता महापालिकेच्या माध्यमातून व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT