Speaking at the planning meeting of Congress MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra, Congress State President Nana Patole esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे लोकसभेची जागा काँग्रेसला : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Dhule : भारत जोडो न्याययात्रेनिमित्त धुळ्यात स्त्रीशक्ती एकवटणार आहे. महिला मेळाव्याच्या माध्यमातून देशातील महिलांना न्यायाची हमी खासदार राहुल गांधी देतील.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : भारत जोडो न्याययात्रेनिमित्त धुळ्यात स्त्रीशक्ती एकवटणार आहे. महिला मेळाव्याच्या माध्यमातून देशातील महिलांना न्यायाची हमी खासदार राहुल गांधी देतील. त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वाची आहे. कार्यकर्त्यांनी यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. ६) येथे केले. (Dhule State President Nana Patole statement Congress will get Dhule Lok Sabha seat)

दरम्यान, धुळे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली असून, या जागेवर काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याययात्रा १२ व १३ मार्चला धुळे जिल्ह्यात येत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी श्री. पटोले बुधवारी (ता. ६) धुळ्यात होते.

आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी खासदार बापू चौरे, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, रमेश श्रीखंडे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. पटोले म्हणाले, की भारत जोडो यात्रेत खासदार गांधी यांचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत करावे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरातील काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांना स्वागतासाठी विशिष्ट जागा ठरवून द्यावी. यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करावी. स्वातंत्र्याची दुसरी लढाई खासदार गांधी लढत आहेत. (latest marathi news)

संविधान वाचविण्याचे हे युद्ध आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून, जनतेच्या कल्याणाचे निर्णय इंडिया आघाडी घेईल, असेही श्री. पटोले म्हणाले. दरम्यान, श्री. पटोले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचीही त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बैठकीला पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी सूत्रसंचालन केले.

भाजप घोषणाही चोरतेय

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तेथील जनतेला पाच गॅरंटी दिल्या होत्या. त्या काँग्रेसने पूर्ण केल्या. मात्र भाजपने ही घोषणा चोरून मोदी की गॅरंटी असा प्रचार सुरू केला आहे. भाजपत नेतेही काँग्रेस आणि इतर पक्षातून चोरून आणले आहेत. आता ते घोषणाही चोरायला लागले आहेत, अशी टीका श्री. पटोले यांनी भाजपवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : १ डिसेंबरला नेमकं काय होणार? CJI सूर्यकांतांचा गूढ इशारा… सुप्रीम कोर्टात मोठा बदल की काहीतरी वेगळंच?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर; उडुपीतील श्रीकृष्ण मठाला देणार भेट

विराट, रोहित अन् रिषभ पंत...! धोनीच्या घरी सजली भारतीय क्रिकेटपटूंची 'मैफिल', पाहा VIDEO

Nagpur Accident : शहरात अपघातांसह मृत्यूंची संख्या घटली; आपरेशन ‘यू-टर्न’चे यश

TET Paper Leak : 'टीईटी' पेपर फुटला! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर, विद्यार्थ्यांकडून कबुली; २६ संशयितांची नावे निष्पन्‍न...

SCROLL FOR NEXT