Abhinav Goyal and Srikant Dhiware.
Abhinav Goyal and Srikant Dhiware. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule District Collector : जिल्ह्यात निरनिराळ्या 472 तक्रारींचे निराकरण : अभिनव गोयल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आचारसंहिता लागू होऊन महिना उलटला आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातून निरनिराळ्या स्वरूपाच्या ४७२ तक्रारींचे वेळेत निराकरण केले आहे. तसेच पोलिस प्रशासनाने विविध तपासणी मोहिमेत कारवाईसह अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गुरुवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिली. (Dhule statement Abhinav Goyal Resolution of 472 different complaints in district)

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते. श्री. गोयल म्हणाले, की आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ११ हजार २९ रंगविलेल्या भिंती, पाच हजार ४९९ पोस्टर्स, तीन हजार ६४६ होर्डिंग्ज, पाच हजार ५७ बॅनर, १७ हजार ५९५ झेंडे असे एकूण ४२ हजार ८२६ रंगविलेल्या भिंतीवरील तसेच पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर व झेंडे हटविण्यात आले आहेत.

तक्रारींचे निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष आहे. प्रत्येक मतदारसंघात फिरते व बैठे पथक कार्यरत आहे. आचारसंहिता कक्षात १९५० हा हेल्पलाइन क्रमांक आहे. त्यावर आतापर्यंत २७८ कॉल आले असून, बहुतांश तक्रारी या ईपीक कार्ड, मतदारयादीत नावाबाबत विचारणा करणाऱ्या असून, त्यांचे निराकरण झाले आहे. नॅशनल ग्रेव्हीलन्सवर १७८ तक्रारी आल्या असून, १७३ तक्रारींचे निराकरण झाले आहे.

उर्वरित तक्रारींचा निपटारा लवकर होईल. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी सी-व्हिजल ॲपवर तक्रार करावी. आचारसंहिता लागू झाल्यापासून या ॲपवर २१ तक्रारी प्राप्त असून, त्यांचे पुढील शंभर मिनिटांत निराकरण झाले. या वर्षी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी होम व्होटिंगची सुविधा उपलब्ध असेल. अशा नागरिकांकडून १२ डी फॉर्म भरून घेण्यात येत आहे. (latest marathi news)

एक खिडकी कक्ष

प्रत्येक मतदारसंघनिहाय तसेच जिल्हास्तरावर उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्षाची (सुविधा कक्ष) स्थापना केली आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त करण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम जिल्ह्यात सुरू आहे. स्वीप उपक्रमांतर्गत ८ एप्रिलला प्रत्येक गावात जनजागृती महारॅलीत मिळून पाच लाख नागरिकांनी सहभाग नोंदविला. या दिवशी निबंध, रांगोळी, पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली.

घरोघरी व्होटर स्लिप

मतदारयादी अपडेशनचे काम संपले असून, व्होटर स्लिपचे काम सुरू होणार आहे. ईव्हीएमच्या (मतदारयंत्र) पहिले सरमिसळीचे काम पूर्ण झाले असून, प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मशिन देण्यात आले असून, ते सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या वर्षी प्रत्येक मतदाराला घरोघरी व्होटर माहिती स्लिप बीएलओद्वारे देण्यात येणार असून, त्या स्लिपवर मतदाराची पूर्ण माहिती असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदाराला व्होटर माहितीपत्रक दिले जाणार असल्याचे श्री. गोयल यांनी नमूद केले.

पोलिस प्रशासनाची धडक कामगिरी

पोलिस अधीक्षक धिवरे म्हणाले, की आचारसंहिता घोषित झाल्यापासून जिल्ह्यात आजपर्यंत ३८ हजार लिटरपेक्षा अधिक मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत ६७ लाख आहे. तसेच २७ लाखांहून अधिक किमतीचा गांजा आणि अफू जप्त करण्यात आले आहे.

अशा प्रकारे महिन्याभरात वाहनांसह दोन कोटी ४१ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून दोन पिस्तुले, तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ५४२ शस्त्र परवानाधारकांपैकी ५२५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्र जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मध्य प्रदेश सीमेवर सहा, तर गुजरात सीमेवर तीन असे एकूण नऊ तपासणी नाके कार्यरत आहेत. दरम्यान, निर्भय वातावरणात निवडणूक व्हावी, कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, अफवांना कुणीही खतपाणी घालू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. गोयल, श्री. धिवरे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT