Crowd at police station entrance, In the second photograph, stick, hammer thrown by the mob at the city police station.
Crowd at police station entrance, In the second photograph, stick, hammer thrown by the mob at the city police station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूरला पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक! जमावाने माजवली दहशत

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : करवंद (ता. शिरपूर) येथील खुनाच्या घटनेचे पडसाद शहरात गुरुवारी (ता. २५) भयकारक पद्धतीने उमटले. करवंद गावापासून पोलिस ठाण्यापर्यंत जाताना हिंस्र जमावाने दहशत माजवली. जमावाचे रूप पाहून भेदरलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. (Dhule Stone pelting at Shirpur Police Station)

शिरपूरच्या इतिहासात २५ एप्रिलचा दिवस भीतिदायक पाऊलखुणा ठेवून गेला. शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता आता सर्वांना सतावू लागली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचा हल्ला करण्यात आला असून, अश्रुधुराचा वापरदेखील प्रथमच झाला आहे.

नेमके काय घडले?

करवंद येथे २४ एप्रिलला रात्री आनंदवाडी वस्तीत विशाल कोळी याच्या मेंदीचा कार्यक्रम होता. तेथे कार्यक्रम नीट पाहता येत नसल्याच्या कारणावरून संशयित विजय सुदाम कोळी याने दिनेश भिल याला लाथ मारली. तो रडू लागल्यामुळे त्याचे वडील जामा नामू भिल संशयित कोळीला जाब विचारण्यासाठी गेले.

त्या वेळी त्यांना विजय कोळी याने गुप्तीसारख्या शस्त्राने भोसकले, तर विकी शिरसाट, सुदाम कोळी यांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत जामा भिल यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाचा योगेश भिल याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रीच संशयावरून काहींना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

संतप्त जमावाचा उद्रेक

दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच करवंद परिसरात रात्रीपासून तणाव पसरला होता. पोलिसांनी बंदोबस्तही दिला. मात्र, गुरुवारी सकाळी जमाव एकत्र झाला. लाठ्याकाठ्या घेऊन धावतपळत जमाव शहराकडे निघाला. सोबत पोलिस वाहनदेखील होते. करवंद नाक्यामार्गे जमाव शहर पोलिस ठाण्यावर जाऊन पोचला. जमावाचे उग्र रूप पाहून शहर व परिसरात दहशत पसरली.

- थेट पोलिसांशी हुज्जत

शहर पोलिस ठाण्यात जमाव भिडणार असल्याची माहिती पूर्वीच मिळाल्याने पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. हेल्मेट, लाठी व ढाल घेऊन पोलिस गेटवर उभे होते. मात्र, जमाव वेगाने प्रवेशद्वारावर धडकला. काहींनी प्रवेशद्वारावर चढून आत उतरण्याचा प्रयत्न केला. त्यात महिलांचाही समावेश होता.

पोलिसांशी हुज्जत घालत जमावाने संशयितांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना फाशी देतो, अशी मागणी केली. त्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यावर जमावाचे समाधान झाले नाही. जमावातून काहींनी विटांचे तुकडे पोलिसांवर फेकले. काही कळण्याच्या आतच दगडविटांचा खच्चून मारा करण्यात आला. त्यात तीन महिला व पुरुष पोलिस कर्मचारी जखमी झाला.

अश्रुधुराचा वापर

जमावाचे बेफाम रूप पाहून हबकलेल्या पोलिसांनी अश्रुधुराच्या एकापाठोपाठ दहा नळकांड्या फोडून जमाव पांगविला. पोलिसांना बलप्रयोग करणेही भाग पडले. या घटनेचे वृत्त कळताच तालुक्यासह लगतच्या पोलिस ठाण्यांतून जादा कुमक शिरपूरला पाठविण्यात आली. अपर अधीक्षक किशोर काळे घटनास्थळी दाखल झाले.

त्यांच्याकडून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे वेळोवेळी माहिती घेत होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही प्रांताधिकारी, तसेच तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेत बंदोबस्ताच्या सूचना दिल्या.

शहरात तणावपूर्ण शांतता

घटनेनंतर शहर आणि करवंद परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. सायंकाळी उशिरा पोलिसांच्या पहाऱ्यात मृत जामा भिल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दगडफेकीत जखमी पोलिसांना उपचारासाठी खासगी रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अशा घटनांचा निवडणुकीतील मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, तसेच पोलिसांनाही खबरदारी घेण्याची सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT