Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : देऊर गावात चोरट्यांचा धुमाकूळ

Dhule Crime : देऊर बुद्रुक येथे रविवारी (ता. ३) मध्यरात्री चोरट्यांनी एकूण सहा घरफोड्या केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देऊर बुद्रुक येथे रविवारी (ता. ३) मध्यरात्री चोरट्यांनी एकूण सहा घरफोड्या केल्या आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झालेल्या घटनेची माहिती सोमवारी (ता. ४) धुळे तालुका पोलिस विभागाला देण्यात आली असता, तत्काळ धुळे पोलिस विभागातर्फे श्वान पथकास पाचारण करण्यात आले. (Dhule total of six burglaries committed by thieves in middle of night in Deur)

चोरीच्या घटनेत चोरांचे उमटलेले बोटांचे ठसे यांचा नमुना घेण्यात आला. देऊर येथील ग्रामस्थ भटू देवरे घरात एकटे राहात होते. रात्री अकराला नेहमीप्रमाणे खोलीत झोपी गेले असता, त्यांच्या घरातील गोदरेज कपाटाचे कुलूप तोडून एक लाख रुपये चोरल्याचे देवरे यांना सकाळी समजले.

तसेच येथिल ग्रामस्थ राजू खैरनार बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली. भटू देवरे यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली आहे. तसेच गावातील विजय नेरकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.

परंतु चोरट्यांना हाती काहीही न लागल्यामुळे तेथून बाळू देवरे यांच्या घराची मागील खिडकी चोरट्यांनी तोडून घरात असलेल्या पेटी बाहेर नेऊन तोडफोड केली. राजेंद्र पिंपळे यांच्या घरातील तांब्याचा हंडा, नथूबाई माळी यांच्या घरातून वीस हजार रुपये चोरून नेले. वरील घरमालकांनी झालेल्या घटनेची माहिती धुळे तालुका पोलिस ठाण्यात कळविली नाही.

सकाळी गावात एकूण सहा घरांत चोरी झाल्याची वार्ता पसरली. या वेळी नेर पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस पदाधिकारी, देऊर गावाचे सरपंच भाऊसाहेब देवरे, पोलिसपाटील सागर भदाणे यांनी घटनास्थळावर भेट देत पाहणी केली. चोरट्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी देऊरसह परिसरातील ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

SCROLL FOR NEXT