Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad and BJP officials
Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad and BJP officials  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मोदींच्या नेतृत्वात विकसित भारत घडविण्यासाठी सज्ज व्हा : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व समाजघटकांतील गोरगरिबांसाठी विविध योजना राबवून त्यांचा लाभ मिळवून देताना त्यांच्या आर्थिक उन्नतीचा प्रयत्न झाला. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊ या, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे केले. (Dhule Union Minister of State for Finance Dr. Karad statement Get ready to build developed India under leadership of Modi)

शासकीय कार्यक्रमानिमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड बुधवारी (ता. १३) धुळे शहरात आले होते. या कार्यक्रमानंतर मंत्री डॉ. कराड यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या येथील पारोळा रोडवरील राम पॅलेस या जनसंपर्क कार्यालयास भेट देत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

खासदार डॉ. भामरे, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, यशवंत येवलेकर.

जितेंद्र चौवटिया, सुनील बैसाणे, डी. एस. गिरासे, किशोर सिंगवी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट यांच्यासह भाजपच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (latest marathi news)

विजयाची पुनरावृत्ती करा

डॉ. कराड म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला राज्यातून ४५ हून अधिक खासदार निवडून द्यायचे आहेत. यासाठी आपणा सर्वांना जोमाने काम करावे लागेल. गेल्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी यश मिळविले होते. आताही हीच पुनरावृत्ती करायची आहे.

आपले नेते नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यांच्या नेतृत्वात विकसित भारत घडवायचा आहे. तुमच्या जोरदार प्रयत्नांमुळे आपण हे ध्येय सहज गाठू, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

संकल्प सिद्धीसाठी काम

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की धुळे जिल्ह्याचे भाजपचे संघटन राज्यातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येत असून, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करत असून, पक्षाची ध्येयधोरणे व शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोचवत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी झटत आहेत. या वेळी भाजपच्या विविध आघाड्यांतर्फे डॉ. कराड यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT