water-shortage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Shortage : जिल्ह्यात कूपनलिकांचे पाणी 500 ते 700 फूट खोलवर; कमी पर्जन्यमानाचा फटका

Water Shortage : गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा जिल्ह्यातील हजारो विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Water Shortage : गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा जिल्ह्यातील हजारो विहिरी कोरड्या पडल्या आहेत. कूपनलिकांची जलपातळी पाचशे ते सातशे फुटांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी पिके विशेषत: फळबागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी विकत आणावे लागत असल्याची विदारक स्थिती आहे. ( Water from wells in district is 500 to 700 feet deep )

जिल्ह्यात यंदा सरासरी ५३५.१० मिमी पाऊस अपेक्षित असताना तुलनेत ४३३.७० मिमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ८१.१० टक्के पाऊस झाला. त्यामुळे टंचाई जाणवत आहे. २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासली नाही. या दोन वर्षांत जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारची कामेही मोठ्या प्रमाणात झाली.

त्यामुळे पाणी आडवा व जिरवा हा उपक्रम सर्वत्र राबवला गेला. ओढे, नाले आणि शेतशिवारातील बांधबंदिस्त केल्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आहे त्याच ठिकाणी मुरल्याने पाणी पातळी बऱ्या‍पैकी वर आली होती. उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक विहिरींनी या दोन वर्षांमध्ये तळ गाठले नव्हते. (latest marathi news)

पावसाने दिला दगा

मात्र, २०२३ मध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मान्सूनच्या पावसाने दगा दिला. परतीच्या पावसानेही निराशा केली. पेरणी केलेली पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांनी आशा सोडली होती. मात्र, अवकाळी पावसाने पिके जगली. त्यातून काही प्रमाणात उत्पादन आले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही तालुक्यांमध्ये थोडाफार सुटला. परंतु, पाणी पातळी सुधारू शकली नाही.

तापी नदीकाठच्या परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी काही प्रमाणात बऱ्यापैकी वर असली तरी बहुतांश भागातील विहिरींची पातळी ७० ते ८० फुटांखाली घसरली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील हजारो विहिरी आजच्या स्थितीला कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामीण जनतेची धावाधाव सुरु आहे. केंद्र सरकारने गावागावात जलसंजीवनी योजना राबवली. त्यातून खोदलेल्या विहिरीही कोरड्या पडल्याने गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT