Dondaicha Bus Stand esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दोंडाईचा बसस्थानकावर भूलभुलय्या; गावांच्या नावाअभावी बोर्ड कोरे

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा : येथील बसस्थानकावर बस कोणत्या गावाला जातात, कोणत्यामार्गे जातील हे कळतच नाही. फलाट क्रमांकासह गावांच्या नावाची पाटी कोरी असल्याने आपली बस कुठे लागते यासाठी बसस्थानकावर प्रवाशांमध्ये भूलभुलय्या होत असतो. क्यूसमोर लागणाऱ्या बससमोरील फलाटावर क्रमांकाबरोबर गावांची नावे लिहावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

शहरात राजपथलगत दोंडाईचा आगाराचे बस स्थानक असून, नजीकच रेल्वेस्थानक आहे. दिवसभरात हजारो प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करतात. एकूण सहा गाड्या क्यूमध्ये लावण्याची व्यवस्था आहे.

या सहा फलाटांवर फलाट क्रमांक व गावांची नावे लिहिलेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांना आपली बस कुठे लागते हे कळत नाही. आपल्या गावाला जाणारी बस शोधण्यासाठी स्थानकाच्या दोन्ही टोकांना प्रवाशांना बॅगा, इतर सामान घेऊन फिरावे लागते.

कधी बस सुटून जाते, तर कधी गैरसोय होते. फलाटाच्या बोर्डावर गावांची नावे त्वरित लिहून होणारी तारांबळ थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

शहरातील बसस्थानकावरून धुळे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा, शिरपूर, साक्री या प्रमुख मार्गांवरील बस धावतात. यासह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्या आहेत. आजूबाजूला बहुतांश गावांत दोंडाईचा आगारातील बस जातात.

परिसरातील गावांतील प्रवाशांना आपली बस कुठे लागते ही नेहमीप्रमाणे माहिती असते; परंतु राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांना मात्र फलटावर गावांची नावे नसल्याने आपली बस कुठे लागेल याबाबत संभ्रम असतो. दोंडाईच्या बसस्थानकावरून इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांना बस कुठे लागेल यासाठी विचारपूस करावी लागते.

सध्या लग्नसराई असल्याने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. नव्याने नेमणूक झालेल्या आगारप्रमुखांनी बसस्थानकावरील फलाटावर क्रमांक टाकून गावांची नावे लिहावीत. जेथे ज्या गावांची नावे नमूद केली जातील तेथेच आपली बस लावण्याच्या सूचनाही चालकांना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

''बसस्थानकाच्या फलाटावर नवीन गावांची नावे टाकण्याची तातडीने व्यवस्था करण्यात येईल. नियोजन करून पेंटर लावून नावे लिहून घेतली जातील, अन्यथा डिजिटल बॅनर करून लावले जाईल.'' -किशोर पाटील, आगारप्रमुख, दोंडाईचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT