'Tank' with owner Rajbhai Ghodewale esakal
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra : सारंगखेडा अश्व बाजारात ‘टॅंक’ ची चर्चा

सारंगखेडा येथील घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरवात झाली असली तरी सध्या दाखल झालेल्या अश्वांपैकी पंजाब च्या बठेंडा येथील ‘टॅंक’ ची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : सारंगखेडा येथील घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरवात झाली असली तरी सध्या दाखल झालेल्या अश्वांपैकी पंजाब च्या बठेंडा येथील ‘टॅंक’ ची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

या टॅंक ची विक्री करायची नाही परंतु त्याची विक्रीची किंमत आलिशान गाड्यांपेक्षाही महाग आहे. ७० लाखापर्यंत टॅंक ची बोली लागली आहे. (Discussion of Tank in Sarangkheda horse market nandurbar news)

परंतु त्याची किंमत दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. ‘टॅंक’ चे मालक राजभाई घोडेवाले यांना मात्र हा घोडा विकायचा नाहीये. कारण तो जातिवंत नुकरा आहे. फक्त प्रदर्शनासाठी यात्रेत ‘टॅंक’ ला आणले आहे.

सारंगखेडा (ता. शहादा) येथील घोडे बाजारात राजभाई गेल्या १० वर्षांपासून सतत येत आहेत. यंदा त्यांच्या दाखल झालेल्या पंजाब येथील टॅंक घोड्याची चर्चा आहे. त्याची अदा, त्याचे सौंदर्य, त्याची चाल, त्याचा रुबाब पाहून सारेच थक्क होत आहेत. त्याची किमतीची २० लाख, ५० लाख नव्हे तर चक्क दोन कोटी आहे.

‘टॅंक’ घोड्याची वैशिष्टे

टॅंक हा पंजाबमधील राजभाई घोडेवाले यांचा अश्व असून त्याची उंची ७० इंच इतकी आहे. देशातील सर्वात उंच घोडा असल्याचा त्यांचा दावा त्यांनी केला आहे. हा नुकरा जातीचा असून पांढरा शुभ्र आहे .

त्याचा खानपानाची विशेष काळजी घेतली जात असते. त्याला दिवसाला ७ लिटर दूध तसेच मका, राईचे तेल बदाम गावरान अंडी दिले जात असतात. अजून अन्य आहारही त्याला दिला जातो. त्याची देखभाल करण्यासाठी तीन व्यक्ती तैनात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT