heart surgery  esakal
उत्तर महाराष्ट्र

अन् ...डॉक्टरच ठरले...! डॉक्टरांसाठी देवदूत..!

डॉ. सूर्यवंशी यांचे प्राण वाचविल्याने डॉक्टरच डॉक्टरांसाठी देवदूत बनल्याची प्रचिती आली.

विनोद शिंदे

कुसुंबा : डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी नियमित तपासणी करण्यासाठी हॉस्पिटल जात होते. मात्र कार चालवीत असताना त्यांना अचानक त्यांना छातीत वेदना होऊन घाम येऊ लागला. त्यांना कार चालवीत असताना कार्डियाक ॲटॅक आला. मात्र त्यांनी तशीच कार चालवत धुळ्यातील इंटरनॅशनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक शिंदे यांचे हॉस्पिटल गाठले, डॉ. शिंदे यांनी वेळीच उपचार सुरु केल्याने डॉ. सूर्यवंशी यांचे प्राण वाचविल्याने डॉक्टरच डॉक्टरांसाठी देवदूत बनल्याची प्रचिती आली.

नेर(ता.धुळे) येथील स्वास्थ्य सुधा क्लिनिकचे डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी घरून कारने नियमित तपासणी जात असताना प्रवासातच त्यांना त्रास होत असल्याचे जाणवले. त्यांना कारचे गियर टाकणेही मुश्कील झाले होते. अशातच त्यांनी डॉ. दीपक शिंदे यांचे अंजना हॉस्पिटल गाठले. डॉ. दीपक शिंदे यांनी तत्काळ उपचार सुरु केले. त्यांनी सीपीआर पद्धतीने डॉ. सूर्यवंशी यांच्यावर उपचार सुरु केले. तत्पूर्वी, डॉ. सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर बेशुद्ध झाले होते. त्यांना आठ वेळा शॉक देण्यात आले तेव्हा ते शुद्धीवर आले. चित्रपटात घडावी तशी घटना डॉ. सूर्यवंशीच्या बाबतीत घडली. धकाधकीच्या जीवनात कोरोनानंतर हृदयविकार वाढले असून, धापा लागणे, थंड घाम येणे, थकवा वाटून येणे असे वाटल्यास तत्काळ हृदयां संबधी चाचण्या करून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. दीपक शिंदे सांगतात.

''अंजना हॉस्पिटलला ॲडमिट होईपर्यंत पूर्णतः बेशुद्ध झालो होतो, कार्डियाक स्ट्रेट झाला होता. डॉ. शिंदेनी आठ वेळा शॉक देऊन मला शुद्धीवर आणले. स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे मला रुग्णाची भावना स्वअनुभवातून समजल्या. डॉ. दीपक शिंदे व त्यांच्या टीमने मला जीवदान देऊन माझ्यासाठी ते देवदूतच ठरले आहेत.'' - डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, स्वास्थ्य सुधा क्लिनिक, नेर

''डॉ. सूर्यवंशी गंभीर अवस्थेत कार चालवत अंजना हॉस्पिटल येथे पोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना तत्काळ आयसीयू मध्ये ॲडमिट करून घेत कार्डियाक शाॕक (कार्डिओव्हर्जन) देऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.'' - डॉ. दीपक शिंदे, कॉर्डीओलॉजिस्ट, अंजना हार्ट हॉस्पिटल, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT