residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

शहीद पित्याचे हेच "ते" स्वप्न...त्याला साकारायचे होते..अन्.. 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बी.एस्सी(आय.टी)पर्यंतचे शिक्षण घेतलेला दीपेश विलास शिंदे सोमवारी (ता. 30) पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस अकादमीतून बाहेर पडत आहे.

असा संघर्ष दिपेशचा...

वडील विलास शिंदे मुंबई पोलिस दलात वाहतूक शाखेत हवालदार होते. मात्र, 31 ऑगस्ट 2016 ला वांद्रे (पश्‍चिम) येथे वाहतूक पोलिस म्हणून कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांशी दोन हात करताना, गुंडांनी त्यांच्या डोक्‍यात रॉड मारला. त्यात विलास शिंदे शहीद झाले. त्या वेळी दीपेश शिंदे उच्चशिक्षित असल्याने मुंबईतील एका आयटी कंपनीत नोकरीला होता.

हेच ते स्वप्न...

पण वडिलांचे पोलिस दलातील राहिलेले अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पोलिस सेवेत येण्यास तयार झाला. त्याला पाठिंबाच नव्हे, तर त्याच्या मागे ठामपणे उभे राहिले ते तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर. त्यानंतर ते पोलिस महासंचालक झाले. त्यांनी दीपेशची अनुकंपा व शहीद पोलिसपुत्र व उच्चशिक्षित म्हणून थेट पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली. त्याचे मामा कृष्णा साळेकर हे दीपेश व कुटुंबीयांच्या मागे सावलीसारखे उभे राहिले. शहीद पित्याचे स्वप्न साकारताना दीपेशचे डोळे पाणावले. मनही दाटून आले अन्‌ वडिलांचे स्वप्न साकारल्याचा आनंदही होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT