fashion industry.jpg 
उत्तर महाराष्ट्र

इच्छा असूनही मॉडेलिंगचे प्रशिक्षण मिळेना!...मग काय.. करा मुंबई-पुण्याची वारी!

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : फॅशन-मॉडेलिंगच्या क्षेत्रात तरुणाईचे वाढते आकर्षण लक्षात घेता अनेक संस्थाही आता या क्षेत्रात उतरल्या आहेत. मॉडेलिंगमध्ये करिअर 
करु इच्छिणाऱ्या तरुणांना अनेक संस्थांद्वारे हातात माईक पकडण्यापासून ते चालण्याचे, बोलण्याचे, हावभावाचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबर 
सौंदर्यविषयक काळजी, आहार आणि पथ्य, कपडे इत्यादींची माहिती दिली जाते. या संस्थाकडून प्रशिक्षणाचा मोठा खर्चही घेतला जातो. मात्र शहरात 
मॉडेलिंगचे प्रशिक्षण देणारी संस्था नसल्याने तरुणांना पुणे - मुंबईची वारी करावी लागत आहे. 

प्रशिक्षणाचा खर्च अमाप..

मॉडेलिंगच्या क्षेत्राची आणि चंदेरी दुनियेची अनेकांना भुरळ पडलेली आहे. त्यामुळे अनेक तरुण उत्कृष्ठ मॉडेल बनण्याचे स्वप्न आता बघु लागले आहे. मात्र यासाठी लागणारे योग्य प्रशिक्षण आणि माहिती नसल्याने तरुणांना मॉडेलिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या आयोजकांची मदत घ्यावी लागते. आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी तरुणांना तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. तर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी तब्बल पन्नास हजार रुपये मोजावे लागतात. यामध्ये कपड्यांसह लागणारा इतर खर्च हा प्रशिक्षणार्थी मॉडेल्सला स्वतः करावा लागतो. 

गेल्या 34 वर्षापासून शहरात फॅशन शो आयोजित करत आहोत यांमध्ये दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत आहे. फॅशन शो हे तरूण तरूणी पुरते मर्यादित राहिले नसून आता आई आणि मुलगी तसेच मुलगा ह्या शोमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. - प्रशांत सानप, डी फ्रंट इव्हेंटस, संचालक 

ल्युमिअर क्विन या फॅशन शोमध्ये वर्षभरात पस्तीस ते चाळीस महिला प्रशिक्षण घेतात तर यात लहान मुलांसाठी किड्‌स फॅशन शोचे देखील आयोजन केले जाते. यामध्ये पाच वर्षांपासून तर पच्चावन वर्षांपर्यंतच्या महिला यात सहभागी होत असतात. हे आयोजक फक्त महिला व लहानमुलीसाठींचे फॅशन शो व मॉडेलिंगचे प्रशिक्षण देत आहे. वर्षांतून दोन- तीन छोटे खाणी फॅशन शो व काही सामाजिक उपक्रमदेखील राबवते. वर्षांतून एक मोठी फॅशन शो घेतला जातो. वर्षभरात साधारणतः एक ते दोन लाखांची उलाढाल या शो मधून होत असते. - स्वराली देवळालीकर, ल्युमिअर क्विन, संचालक. 
 

नाशिक शहरात मॉडेल्समध्ये करीअर करू इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षणासाठी कुठलीच रजिस्टर अशी संस्था नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे, मुबंई याठिकाणी जावे लागते. त्यामुळे शहरातून वर्षभरात फक्त पाच ते दहा मॉडेल्स हे मालिका अथवा इंटरनॅशनल फॅशन शोसाठी पाञ ठरतात. यामुळे पूर्णपणे त्याचे प्रशिक्षण तरूणांना घेता येत नाही. वर्षभरामध्ये शहरात वीस पेक्षा जास्त मोठे शो होतात. शिक्षण संस्थानी पुढाकार घेवून तरूणांना प्रशिक्षणासाठी ग्रुमिंगची सोय उपलब्ध करून द्यावी. - राहूल काकड, मॉडेल 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT