Banana garden damage due to heat stress
Banana garden damage due to heat stress  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अवकाळी पावसानंतर उन्हाचा तडाखा; शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहादा तालुक्यातील म्हसावद परिसर केळी उत्पादक परिसर म्हणून परिचित आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली आहे.

सध्या प्रचंड तापमान वाढले असून काढणीला आलेली केळी धोक्यात आली आहे. (due to rise in temperature harvested bananas are in danger nandurbar news)

सतत वाढणाऱ्या तापमानाचा चटका केळीच्या बागांना बसत असून ऐन हंगामात हाती आलेली केळी उद्‌ध्वस्त होत असल्याने अवकाळी पावसानंतर शेतकरी उन्हाच्या तीव्रतेने हवालदिल झाला आहे.

सध्या परिस्थितीत जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा ४३ ते ४४ पर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. या प्रचंड उन्हाचा चटका आणि उष्ण हवेच्या फटका शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो की काय अशी परिस्थिती आहे.

पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी, वादळी वाऱ्यासह केळी, पपई, हरभरा, मूग, मकाचे नुकसान झाल्याचा फटका शेतकऱ्यांनी सहन केला. आता वाढत्या तापमानाचा चटका शेतशिवारात हैदोस घालत आहे.

एकरी मदत मिळावी

शासनाने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या अनुषंगानेच, नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये एकरी आर्थिक मदत जाहीर करून त्वरित द्यावी. अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी पुष्पा पटेल, लिमजी पाटील, सुजित पाटील, पुरुषोत्तम यादव पाटील, किशोर पाटील, अंजुम तेली, योगेश पाटील, अनिल पटेल, विठ्ठल पाटील, भगवान चौधरी यांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बागेचा सांभाळ करावा कसा

वाढते तापमान, उष्ण हवेमुळे दिवसातून पंधरा-वीस केळीची झाडे घडासह जमिनीवर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. जमिनीवर पडलेले केळीचे हिरवेगार, सुमारे तीस ते पस्तीस किलोचे घड व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. ते वाया गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

बारा महिने तळहाताच्या फोडासारखी काळजी घेऊन, वाढविलेली बाग अशी उद्‌ध्वस्त होताना पाहून शेतकरीच उद्‌ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. रोप, लागवड, मशागत, खते, मंजुरी इत्यादीवर आदी लाखो रुपये खर्च करून वाढविलेल्या बागेचा सांभाळ करावा कसा या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे.

शेत मळ्यात ऐन काढणीच्या हंगामात रोज टन अर्धा टन वजनाची केळी झाडे व घड पडल्याचे दिसून येत असून बागेत हे नुकसान पाहण्याचे धारिष्ट्य शेतकऱ्यांत उरले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT