Sub-Divisional Police Officer Datta Pawar, Sarpanch Prithviraj Rawal, Sanjay Chaudhary, Pranavarajsinh Rawal, etc. while welcoming the youths who entered Sarangkheda after walking 800 kilometers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra : उच्च शिक्षित तरुणांची 800 किलोमीटरची अश्वरपेट; आयोजकांकडून जंगी स्वागत

हैदराबाद ते सारंगखेडा अशी ८०० किलोमीटरची घोडेस्वारी करत १५ दिवसांत तिघा उच्चशिक्षित तरुणांनी शनिवारी (ता.२३) ‘चेतक फेस्टिव्हल’ गाठले.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : हैदराबाद ते सारंगखेडा अशी ८०० किलोमीटरची घोडेस्वारी करत १५ दिवसांत तिघा उच्चशिक्षित तरुणांनी शनिवारी (ता.२३) ‘चेतक फेस्टिव्हल’ गाठले.

यावेळी सारंगखेडा गावाचा वेशीवर चेतक फेस्टिव्हलचे प्रमुख जयपालसिंह रावल आणि नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करून फेस्टिव्हलपर्यंत वाजत गाजत मिरवणुकीने आणण्यात आले.(educated youth 800 km travel for chetak festival of sarangkheda yatra nandurbar news)

सारंगखेडा (ता. शहादा) येथील श्री एकमुखी दत्तयात्रेला २६ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. येथील इतिहासकालीन अश्व बाजार नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यत भल्याभल्यांना भुरळ घालणारा आहे. येथील अश्व बाजाराचा मोह या तिघा तरुणांनाही आवरता आला नाही. हैदराबाद ते सारंगखेडा सुमारे ८०० किलोमीटरचे अंतर घोड्यावर पार करत ‘चेतक फेस्टिव्हल’ साठी हैदराबाद येथील तीन जण दाखल झाले आहेत.

हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथून (ता.९) डिसेंबरला तिघे युवक निघाले. त्यातील डॉ. चेतन कुमार हे एमडी जनरल मेडिसिन असून एम.फिल पिलानी येथे करत आहेत. दुसरे शिवकुमार हे अमेरिका स्थित आयटी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. तिसरे सहभागी युवक नरेंद्र राजू हे सहाय्यक दिग्दर्शक आणि गणिताचे प्राध्यापक आहे.

चेतक महोत्सव व अश्वांची माहिती जनतेला व अश्वशौकीनांना कळावी याचा इतिहास युवा पिढीला माहिती व्हावा, म्हणून हैदराबाद ते सारंगखेडा हे ८०० किलोमीटर अंतर अश्वावर स्वार होऊन अश्वभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला होता.

यावेळी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, सरपंच पृथ्वीराज रावल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, चेतक समितीचे आयोजक प्रणवराजसिंह रावल, विनित गिरासे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT