Election of Gram Panchayat esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Gram Panchayat Election : ‘त्या’ क्षेत्रात आचारसंहिता लागू; जिल्ह्यात 31 ग्रामपंचायतींत निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Gram Panchayat Election : डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता. ३) जाहीर केला. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवार (ता. ६)पासून सुरू होईल.

५ नोव्हेंबरला मतदान होईल. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली. ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत.(Code of Conduct is applicable for election of Gram Panchayat in district dhule news)

ग्रामपंचायतींची ही निवडणूक राजकीय पक्षांच्या दृष्टीने लोकसभेसाठी चाचणी परीक्षाच असेल. राजकीय पक्षांच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी याद्वारे पक्षाचे असलेले प्राबल्य दिसून येते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचा कस लागेल.

निवडणूक कार्यक्रम

जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.

यामध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट संरपच पदासाठीदेखील निवडणूक होणार आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील १३, शिरपूर तालुक्यातील १५ आणि साक्री तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

याबाबत शुक्रवारी (ता. ६) निवडणुकीची नोटीस जाहीर होईल. १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन यादरम्यान नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर करण्याची मुदत असेल. २३ ऑक्टोबरला सकाळी अकरापासून उमेदवारी अर्जांची छाननी होईल. अर्ज माघारीची मुदत २५ ऑक्टोबरच्या दुपारी तीनपर्यंत आहे.

त्याच दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्हवाटप होईल. नंतर ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व ३१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

निवडणूक होणारी गावे

निवडणुकीत शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र. बे., वालखेडा, कदाणे, कंचनपूर, वाघोदे, परसमाळ-कुमरेज, साळवे, वाडी, होळ प्र. बे., अंजनविहिरे, गव्हाणे-शिराळे, मांडळ, पथारे. तसेच शिरपूर तालुक्यातील उंटावद, कुरखळी, अंतुर्ली, नांथे, खामखेडा प्र. था., आमोदे, ताजपुरी,गिधाडे, खर्दे बुद्रुक, बभळाज, वाडी खुर्द, लोंढरे, तरडी, उमर्दा, टेंभेपाडा. साक्री तालुक्यातील मोहाणे, गणेशपूर, डांगशिरवाडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT