Employees march through city beating tala mridanga for implementation of old pension scheme esakal
उत्तर महाराष्ट्र

Employee Strike : दुसऱ्या दिवसाही संप सुरूच; कार्यालयांमध्ये शुकशुकाट...

सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा (जि. धुळे) : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करून कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटी मंजूर होण्यासाठी मंगळवार (ता. १४)पासून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून, बुधवारी (ता. १५) दुसऱ्या दिवशी संप सुरू असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. (Employees strike old pension scheme implementation through city beating tala mridanga dhule news)

दरम्यान, आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात मोर्चा नेला. येथील पंचायत समितीपासून सकाळी अकराला टाळ-मृदंग वाजवत मोर्चास सुरवात झाली.

स्टेशन रोडमार्गे तहसील कार्यालयात मोर्चा गेला. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चा परत पंचायत समितीकडे वळविण्यात आला.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

कर्मचाऱ्यांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘पेन्शन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणा दिल्या. पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन करून टाळ-मृदंग वाजवत व भजन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिंदखेडा तालुक्यातील संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT