Mega Recruitment sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Job News : धुळ्यात 14 सप्टेंबरला रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Job News : जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवारी थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली. (Employment fair on September 14 in Dhule news)

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) आणि बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, धुळे यांच्यातर्फे येथे बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एसएसव्हीपीएस) धुळे येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत रोजगार मेळावा (प्लेसमेंटचे) आयोजित केला आहे.

यासाठी मॅक्रॉन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड, पुणे अंतर्गत बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांसाठी एकूण ४०० रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे.

नोंदणी करा, संपर्क साधा

धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिनमधून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटणावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्रॉइव्ह-७ पर्याय (२०२३-२०२४) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी.

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदीप बोरसे (मो. ९८२२२९९८४४) तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे (मो. ८६००३०३४८७) यांच्याशी संपर्क साधावा.

ऑनलाइन सेवा घेताना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाइन अंतर्गत हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० येथे सकाळी आठ ते रात्री आठदरम्यान ही सेवा उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT