crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मध्य प्रदेश निवडणुकीमुळे उत्पादन शुल्कची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मध्य प्रदेश सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केल्याची माहिती पथक निरीक्षक दत्तात्रय दिंडकर यांनी दिली.(Excise duty action due to Madhya Pradesh elections dhule crime news)

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. वाहनातून अवैध बनावट देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानुसार १ नोव्हेंबरला रात्री संशयित वाहनाचा पाठलाग करण्यात आला.

परंतु, अंधाराचा फायदा घेत वाहनचालक फरारी झाला. घटनास्थळावरुन बोलेरो पिक-अप वाहनासह बनावट देशी दारूचा एकूण आठ लाख २१ हजार ४४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फरारी वाहनचालकासह संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या घटनेत पुढे जप्त मोबाईलद्वारे तपास करून वाहनमालकास अटक झाली.

श्री. दिंडकर, निरीक्षक आर. आर. धनवटे, दे. प्र. नेहूल, दुय्यम निरीक्षक एस. एस. शिंदे, एस. एस. आवट, जवान विजय नाहीदे, नीलेश मोरे, जवान काशीनाथपुरी गोसावी यांनी कारवाईसाठी सहकार्य केले. श्री. दिंडकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, पुणे पोलिसांच्या तपासातून अंतिम माहिती

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT