husband-wife.jpg 
उत्तर महाराष्ट्र

शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराला तिच्या पतीने शुक्रवारी (ता.6) सकाळी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. सदरची घटना पाथर्डी गाव-गौळाणे रस्त्यावर घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गौळाणे रस्त्यावरील घटना : असा घडला प्रकार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरपत सिंह गावित असे मृताचे नाव असून संशयित विठ्ठल गव्हाणे पसार झाला आहे. संशयित गव्हाणे आणि नरपतसिंह गावित हे दोघे पाथर्डी गावात शेजारी-शेजारी राहत होते. पंधरा दिवसापूर्वी दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे घरमालकाने संशयित विठ्ठल गव्हाणे यास घर खाली करून काढून दिले होते. दरम्यान, शुक्रवार (ता.6) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गावित हा कंपनीत जाण्यासाठी पाथर्डी-गौळाणे रस्त्याने जात होता. त्यावेळी संशयित विठ्ठल गव्हाणे याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. डोक्‍यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केल्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तश्राव झाल्याने गावितची परिस्थिती गंभीर होती.

अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून समोर

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान, सागर पाटील हे घटनास्थळी पोहोचले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, साडेदहाच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. दरम्यान, संशयित गव्हाणे याच्या पत्नीशी गावितचे अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून  समोर येत आहे. संशयित गव्हाणे फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 2nd Test: कुलदीप यादव, लोकेश राहुल सरावाला आलेच नाही; दुसऱ्या सामन्याला मुकणार? प्रशिक्षकाने Playing XI बाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai News: जमीन योग्य प्रक्रियेविना वापरू नका, धोबीघाटाच्या पुनर्विकासावरुन न्यायालयाने महापालिकेला सुनावले

Marathi News Live Updates : पॅलेट गनच्या गोळ्यांवरून राहुल गांधी आक्रमक; ‘एफआयआर नोंदवल्याशिवाय येथून हलणार नाही’

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT