extreme step was taken by student of Kothali Ashram School nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कोठली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

कोठली (ता. नंदुरबार) येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील आठवीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

धानोरा : कोठली (ता. नंदुरबार) येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील आठवीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलीचे वय १३ वर्षे ११ महिने दोन दिवस आहे. (extreme step was taken by student of Kothali Ashram School nandurbar news)

विद्यार्थिनीने शासकीय आश्रमशाळेतील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. अक्कलकुवा तालुक्यातील खुशीमाल येथील रहिवासी असून, तिने गळफास कशाबद्दल घेतला ते कारण अद्याप समजू शकले नाही.

विद्यार्थिनीचा मृत्यदेह नातेवाईक आल्यावर त्यांना सोपविण्यात आला. पुढील तपासणी अहवालासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आला.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे, उपनिरीक्षक जगन वळवी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, विस्ताराधिकारी निर्मल माळी, जमादार वंतू गावित आदी घटनास्थळी उपस्थित होते.

घटनेचे कारण गुलदस्त्यात असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच घटनेचा खरा तपशील कळेल.

विद्यार्थिनीच्या नातेवाइकांचा आरोप

नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थिनीला तिची आई चार दिवस अगोदरच भेटून गेली होती तेव्हा मुलगी आनंदित होती.

घरी शाळेतील प्रशासनाने फोनवरून मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती दिली. नंतर थोड्या वेळाने मुलीने गळफास घेतला असे सांगितल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी शाळा प्रशासनावर केला.

मुलीला न्याय मिळावा, आम्ही जेव्हा भेटायला आलो होतो तेव्हा मुलगी चांगली होती, अचानक हे कसं काय, असा प्रश्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT