Fake GST officers extort half lakh from trader Dhule Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud News : नकली GST अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्याला सव्वा लाखाचा गंडा

लाल दिव्याच्या वाहनातून आलेल्या नकली जीएसटी अधिकाऱ्यांनी शहरात पटीयाला (पंजाब) येथील व्यापाऱ्याला सव्वा लाखात गंडविले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : लाल दिव्याच्या वाहनातून आलेल्या नकली जीएसटी अधिकाऱ्यांनी शहरात पटीयाला (पंजाब) येथील व्यापाऱ्याला सव्वा लाखात गंडविले. मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ व्यापाऱ्याच्या ट्रकला अडविले.

कर चलनात फर्मच्या नावात चूक असल्याचे सांगत चालकाच्या माध्यमातून व्यापाऱ्याशी तडजोड करीत ऑनलाइन एक लाख ३० हजार घेत फसवणूक केली. याबाबत गुरुवारी (ता. ४) आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (Fake GST officers extort half lakh from trader Dhule Crime News)

कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (रा. ५० अ, विकास कॉलनी, पटीयाला, पंजाब) या व्यापाऱ्याच्या फिर्यादीनुसार त्यांची पटीयाला शहरात साई मार्केट येथे बावा एअर कन्डीशिंग नावाची कंपनी आहे. कंपनीतून त्यांनी ट्रकमधून (पीबी ११स सीझेड ०७५६) चिलिंग एअर कन्डीशन मशिन पुणे येथे पाठविले.

यादरम्यान १७ नोव्हेंबरला दुपारी साडेबारा ते अडीचच्या दरम्यान शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वारानजीक एक लाल दिव्याच्या गाडीतील तीन ते चार अनोळखी खाकी वर्दीतील व्यक्तींनी ट्रकला अडविले. त्यांनी ट्रकचालकाच्या माध्यमातून व्यापाऱ्यास मोबाईलद्वारे व्हॉट्सअ‍ॅप कॉल करण्यास सांगितले.

कॉल केल्यावर जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करीत कर चलनात फर्मच्या नावात चूक असल्याचे म्हणत तुम्हाला दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर बिलावरील एकूण १८ टक्के जीएसटीप्रमाणे तीनपटीने जीएसटी म्हणजे १२ लाख ९६ हजारांची मागणी केली.

त्यानंतर तडजोडीअंती एक लाख ३० हजार रुपये मोबाईल गुगल पेद्वारे घेऊन फसवणूक केली. दरम्यान, घटनेनंतर ट्रकचालक पटीयाला येथे परत गेला. त्याच्याकडून व्यापाऱ्याने घटनेची माहिती घेतली.

तसेच ज्या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठविले होते, त्यावर कॉल केला असता तो वेळोवेळी बंद आला. तसेच स्थानिक जीएसटी अधिकारी यांच्याकडून खात्री केली असता जीएसटी बिलात कोणत्याही प्रकारची चूक नव्हती.

आपली फसवणूक झाल्याचे व्यापारी बाजवा यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी गुरुवारी मित्र अवतारसिंग धरमपाल भल्ला यांच्यासह आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघा बनावट जीएसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT